विटा , ( प्रतिनिधी ) : महसूल विभाग जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवित असून सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून अडीअडचणी सोडवून प्रत्येक घटकापर्यंत शासकीय योजना पोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी व्यक्त केले.
येथील बळवंत कॉलेज मध्ये महसूल सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. दयानिधी म्हणाले , आजचा युवक हा देशाचा आधारस्तंभ असून जीवनामध्ये तो सक्षमपणे जगण्यासाठी आणि उभा राहण्यासाठी त्यास सर्वांगीण ज्ञान असले पाहिजे आणि देशाचा आधारस्तंभ म्हणून तो सर्वगुणसंपन्न घडविण्याचे काम शाळा महाविद्यालय करत असून त्याला महसूल विभागाची साथ दिली जाईल. विद्यार्थ्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.
त्यानुसार महाविद्यालयातील युवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे विविध दाखले,जमीन दस्त नोंदणी बाबतची माहिती, भूमी अभिलेख,अंतर येणारे मोजणी ,पीक पाणी नोंदणी ,संजय गांधी निराधार योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत योजना, सातबारा दस्त नोंदणी, दत्तक पत्रक अशा विविध विषयावरती या युवा संवादामध्ये माहिती देण्यात आली.
उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल,तहसीलदार उदयसिंह गायकवाड ,निबंधक प्रशांत पाटील, उपविभागीय अधिक्षक श्रीमती एस.ए. गाढवे, विष्णू मस्के ,पर्यवेक्षक सर्जेराव सावंत यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक विष्णू मस्के यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा शिंदे यांनी केले. डॉ श्रेया पाटील यांनी आभार मानले.

