• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | तासगावातील सावकाराला बेंगलोरमध्ये अटक : तासगाव पोलिसांची धडक कामगिरी.

Admin by Admin
July 29, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | तासगावातील सावकाराला बेंगलोरमध्ये अटक : तासगाव पोलिसांची धडक कामगिरी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तासगाव तालुक्यातील कौलगे येथील खाजगी सावकार दत्तात्रय औताडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. बेंगलोर येथून त्याला जेरबंद करण्यात आले आहे. तासगाव पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कौलगे येथील कृषी सहाय्यक असलेला दत्तात्रय औताडे हा खासगी सावकारी करीत होता. अनेकांना त्याने भरमसाठ व्याजाने पैसे दिल्याच्या तक्रारी आहेत. व्याजाच्या धंद्यात त्याने मोठ्या प्रमाणावर ‘माया’ गोळा केल्याची चर्चा आहे. त्याच्या व्याजाच्या आकड्याने अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. याबाबत त्याच्याविरोधात एकाने खासगी सावकाराची तक्रार दाखल केली होती.

तक्रार दाखल होताच औताडे हा पळून गेला होता. गेले महिनाभर तो पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, अटकेची कारवाई टाळण्यासाठी त्याने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. दरम्यान औताडे याला तातडीने अटक करून त्याची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी केली होती. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना दिले होते. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, न्यायालयाने औताडे याचा जामीन फेटाळल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. तो कर्नाटकातील बेंगलोरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल चव्हाण, हणमंत गवळी यांचे पथक बेंगलोरकडे रवाना झाले. तेथून औताडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

Previous Post

‘महात्मा गांधीचे वडील मुस्लिम’ म्हणणारे भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून का दुरावले.?

Next Post

प्रॉपर्टी च्या वादातून मुलाने केला बापाचा खून

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पाहुणे म्हणून आले, अन् अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेले

प्रॉपर्टी च्या वादातून मुलाने केला बापाचा खून

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group