कडेगाव :- घर आणि शेतजमीन नावावर करून देत नसल्याचे कारणावरून संशयित प्रदीप तानाजी माने रा विहापूर याने आपल्याच वडिलांना म्हणजे तानाजी यशवंत माने (वय ७० वर्षे )यांना लाकडी दांडक्याने जबरी मारहाण केली होती उपचारा दरम्यान तानाजी माने यांचा मृत्यू झाला असून संशयित प्रदीप यास कडेगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.यात मयताच्या पत्नी मंगल माने यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, शनिवार दि २९ जुलै रोजी दुपारी १ चे सुमारास फिर्यादी मंगल माने यांचे राहते घरी म्हणजे विहापूर येथे संशयित प्रदीप याने त्याचे वडील मयत तानाजी यशवंत माने हे शेतजमीन व घर नावावर करून देत नाहीत या कारणावरून लाकडी दांडक्याने आपल्या वडिलांना जबरी मारहाण केली होती. तसेच त्यांचे तोंड व डोके फरशीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जखमीना ताबडतोप उपचारासाठी कडेगाव येथे हालवण्यात आलं होतं मात्र त्यांची प्रकृती पाहून त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले होते. सांगली येथे तानाजी माने यांच्या पत्नी मंगल यांची फिर्याद घेण्यात आली व संशयितावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी दि ३० जुलै रोजी पहाटे १ च्या सुमारास जखमी तानाजी माने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संशयित प्रदीप यावर वाढीव ३०२ हे कलम लावण्यात आले.
यानंतर रविवारी तात्काळ दुपारच्या सुमारास कडेगाव पोलिसांनी संशयित प्रदीप यास ताब्यात घेतलं असून त्याला सोमवारी कडेगाव येथील न्यायालयात हजर केलं जाणार आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी करीत आहेत.

