Friday, June 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास एलसीबीकडून अटक

Admin by Admin
July 29, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
सांगलीत घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास एलसीबीकडून अटक

शहरासह कुपवाड परिसरात घर फोडून ऐवज लंपास करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. राकेश शिवलिंग हदीमणी (वय २४, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून १४ हजार रुपयांच्या रोकडसह तीन लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करून कारवाईसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कार्यरत आहे. या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार धामणी रोडवरील शांतीबन चौक परिसरात छापा मारून हदीमणी यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीमध्ये १४ हजार रुपयांची रोकड, चार तोळे ६ ग्रॅमचे सोन्याचे दागिने तर १२५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने मिळून आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत विश्रामबाग पोलिस ठाणे, कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्यावेळी घरफोडी करून ऐवज लंपास केल्याचे सांगितले.

हदीमणी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, कुमार पाटील, बिरोबा नरळे, सुनिल जाधव आदींसह पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

कडेगावात गगन चुंबी ताबूतांच्या भेटीचा सोहळा उत्साहात

Next Post

‘महात्मा गांधीचे वडील मुस्लिम’ म्हणणारे भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून का दुरावले.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘महात्मा गांधीचे वडील मुस्लिम’ म्हणणारे भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून का दुरावले.?

'महात्मा गांधीचे वडील मुस्लिम' म्हणणारे भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून का दुरावले.?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014