• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगावात गगन चुंबी ताबूतांच्या भेटीचा सोहळा उत्साहात

हजारो भाविकांची उपस्थिती

Admin by Admin
July 29, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष, सामाजिक
1 min read
0
कडेगावात गगन चुंबी ताबूतांच्या भेटीचा सोहळा उत्साहात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कडेगाव :- सांगली जिल्ह्यातील कडेगावात गेली १५० वर्षांपासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजही ही परंपरा चालू वर्षीच्या मोहरम सणात दिसून आली. शनिवारी (दि. २९) सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापुर, सोहोली, निमसोड, वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आले. त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजाअर्चा करून सकाळी ११ वाजता मानाचा सात भाई ताबूत उचलण्यात आला. येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला. हा ताबूत वीजबोर्डाजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर बागवान, आत्तार, शेटे, माईनकर आणि अन्य ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले. त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला. आणि सातभाई- पाटील, सातभाई • बागवान, सातभाई आत्तार, सातभाई माईनकर हकीम, या उंच – – ताबूतांच्या प्राथमिक भेटी ११.३० वाजता संपन्न झाल्या.

या भेटी म्हणजे राम-भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केले. आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला. त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) कडे निघाले. यावेळी इमाम हुसेन झिंदाबाद, मौला अली झिंदाबाद, धुला.. धूला अशा घोषणा देण्यात येत होत्या. दरम्यान वाटेत तांबोळी, शेटे व अन्य ताबूत सहभागी झाले. त्यानंतर मानकऱ्यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले. सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेश बाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) या ठिकाणी एकत्रित केले गेले. त्या ठिकाणी मेलवाल्याकडून “महान भारत देश अमुचा घुमवू जय जयकर “,” तसेच प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा’ ‘हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे” अशी ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली.

त्यानंतर हिंदू मानकऱ्यामार्फत मसूद माता ताबूत पंजे, बारा इमाम पंजे मानकऱ्यामार्फत आणण्यात आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला. मानाप्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले. दुपारी २.३० वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले. दरम्यान सकाळी ७ पासून विटा, कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबईसह कर्नाटकातून लोक मिळेल, त्या वाहनाने कडेगावला येत होते. गावातील रस्ते, गल्ली बोळ आबालवृद्धांनी गजबजून गेले होते. तसेच महिलांची व युवकांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. मान्यवरांसाठी खास स्टेज उभारण्यात आला होता. यावेळी नगरपंचायतकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मोहरम भेटी सोहळा पाहण्यासाठी माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी आमदार मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, डॉ. जितेश कदम, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, चंद्रसेन देशमुख, सुरेश निर्मळ, गुलाम पाटील, डी. एस. देशमुख, दीपक भोसले, विजय शिंदे, रविंद्र देशपांडे, तहसीलदार अजित शेलार, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम आदीसह नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक,हिंदू मुस्लिम बांधव भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

भारती बँकेवर सायबर हल्ला; पुणे, सांगली, कोल्हापुरातील खातेदारांचे १ कोटी रुपये लंपास

Next Post

सांगलीत घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास एलसीबीकडून अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास एलसीबीकडून अटक

सांगलीत घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास एलसीबीकडून अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group