• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी भिडेंविरोधात आंदोलन..

यवतमाळमध्येही भिडेंच्या अटकेची मागणी करत बॅनर-पोस्टर फाडले

Admin by Admin
July 29, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी भिडेंविरोधात आंदोलन..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी अमरावतीत राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत . भिडेंच्याविरोधात पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भिडेंविरोधात आक्रमक झाले आहेत. यवतमाळमध्येही आंबेडकरवादी संघटनांनी भिडेंच्या अटकेची मागणी करत बॅनर आणि पोस्टर फाडले आहेत .

याबाबत अधिक माहिती अशी कि , पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी भिडे यांच्या फोटोला जोडे मारुन कार्यकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. संभाजी भिडेंवर कारवाईची मागणी यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केली आहे.त्यांनी भिडेंच्या फोटोला चपलांचा हार घातला. प्रशांत जगताप म्हणाले, संभाजी भिडे यांच्यावर शिंदे-फडणवीस सरकारने तत्काळ अटकेची कारवाई केली पाहिजे. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. भिडेंना अटक केली नाही तर त्यांच्या वक्तव्याशी शिंदे – फडणवीस सरकार सहमत आहे, असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे राष्ट्रपित्याचा अपमान करणाऱ्या भिडेंवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

दरम्यान यवतमाळमध्ये आज संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्यानिमित्ताने शहरात त्यांच्या स्वागताचे बॅनेर-पोस्टर्स लावण्यात आले होते. हे बॅनर आणि पोस्टर अज्ञातांकडून फाडण्यात आले आहे. भिंडेंच्या यवतमाळ दौऱ्यालाही अनेक संघटनांकडून विरोध होत आहे. आंबेडकरवादी संघटना भिडेंविरोधात आक्रमक झाल्या आहेत. या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु झाली आहे. दुसरीकडे संभाजी भिडे यवतमाळमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान त्यांच्या वक्तव्यावरुन तणाव वाढला आहे.

Previous Post

संभाजी भिडेंविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल

Next Post

जळावू लाकडाच्या ट्रकमधून अजगराची सवारी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जळावू लाकडाच्या ट्रकमधून अजगराची सवारी

जळावू लाकडाच्या ट्रकमधून अजगराची सवारी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group