इचलकरंजी (प्रतिनिधी) : कबनूर येथील कबनूर – चंदूर रोडवरील विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचा फलक अज्ञाताने फाडला. आज बुधवारी सकाळी ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते घटनास्थळी तातडीने जमा झाले. या घटनेचा तीव्र निषेध करत हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली.
फलक अज्ञाताने फाडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेकडून गावबंदची हाक देण्यात आली. यावेळी भागातील दुकानदार, व्यावसायिकांयानी दुकाने बंद केली. यानंतर कबनूर गांवही बंद ठेवण्यात आले. या प्रकाराने गांवात तणावपूर्ण वातावरण बनले होते.
दरम्यान, शिवाजीनगरचे पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कबनूर, इचलकरंजी परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

