• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

यमगरवाडीत पोलीस पाटलांची धरली कॉलर,

यात्रेत हाणामारी तमाशावेळी घडला प्रकार :

Admin by Admin
April 4, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
यमगरवाडीत पोलीस पाटलांची धरली कॉलर,
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तासगाव : खबऱ्या प्रतिनिधी

तासगाव तालुक्यातील यमगरवाडी येथील मयाबाच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तमाशाच्या कार्यक्रमावेळी युवकांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. एकाला तर शर्टची बटणे तुटेपर्यंत बदडण्यात आले. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटील संजय यमगर यांनाही यावेळी धक्काबुक्की झाली. तत्पूर्वी वायफळे येथील काही युवकांनीही तमाशावेळी धिंगाणा घातला. यावेळी एकाने पोलीस पाटील यमगर यांची कॉलर पकडली. त्यामुळे दोन्ही वेळेस तमाशाचा कार्यक्रम थांबवण्यात आला. त्यानंतर तणावपूर्ण वातावरणातच हा कार्यक्रम झाला.

गेल्या दोन दिवसांपासून यमगरवाडी येथे मयाबाची यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त गावात विविध धार्मिक, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या भीषण परिस्थितीमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी आयोजित यात्रेत आनंदाचे वातावरण होते. यात्रा कमिटीतील वादही संपवण्यात आले होते. परिणामी ही यात्रा गुण्यागोविंदाने सुरू होती.

शनिवारी रात्री गावात ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळीही किरकोळ बाचाबाची झाली. मात्र वादावर पडदा टाकून कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला होता. तर काल रविवारी रात्री दत्तोबा तिसंगीकर यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला होता. रात्री 9.30 च्या दरम्यान कार्यक्रमास सुरुवात झाली. तमाशाच्या कार्यक्रमास पंचक्रोशीतील युवक, तमाशा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणगवळणीचा कार्यक्रम झाल्यानंतर व्हरायटी शो सुरू झाला. हिंदी – मराठी गाणी सुरू असतानाच स्टेजसमोर बसलेले अनेक युवक उठून नाचू लागले. यातून गोंधळास सुरुवात झाली. यावेळी किरकोळ कारणावरून वायफळे येथील काही युवकांनी धिंगाणा घातला. यातच एकाने पोलीस पाटील संजय यमगर यांची कॉलर धरली. त्यामुळे काही काळ कार्यक्रम थांबवण्यात आला. थोड्या वेळानंतर वादावर पडदा टाकून कार्यक्रम सुरू झाला.

थोडा वेळ कार्यक्रम चालला. मात्र पुन्हा काही युवक गाण्याच्या ठेक्यावर ताल धरू लागले. त्यातच काहींनी नाच करणाऱ्या तरुणीच्या दिशेने खडे भिरकावले. यातून वाद झाला. वाद वाढत जाऊन जोरदार हाणामारी झाली. हाणामारीत एकाला शर्टची बटणे तुटेपर्यंत बदडण्यात आले. ही भांडणे सोडवण्यास आलेल्या पोलीस पाटील यमगर यांनाही धक्काबुक्की झाली.

यावेळी पुन्हा 15 मिनिटे कार्यक्रम बंद ठेवण्यात आला. काहींनी स्टेजवर जाऊन माईकवरून एकमेकांची मस्ती काढली. कोणाला खुमखुमी असेल तर पैसे भागवून धिंगाणा घाला, असे आव्हान देण्यात आले. दरम्यान, वादावर पडदा टाकून पुन्हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.

Previous Post

सांगलीत उन्हाच्या कडाक्यात अवकाळी पाऊस

Next Post

पोलीस निरीक्षकासह ४ कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, खुनाचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलीस निरीक्षकासह ४ कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, खुनाचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

पोलीस निरीक्षकासह ४ कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, खुनाचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group