• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

चोरट्यांची हिंमत पाहा, पोलीस मुख्यालयातून केली चोरी, मग चर्चा तर होणारच..

Admin by Admin
July 23, 2023
in क्राईम
1 min read
0
चोरट्यांची हिंमत पाहा, पोलीस मुख्यालयातून केली चोरी, मग चर्चा तर होणारच..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शहरातील गुन्हेगारांवर गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चा होत आहे. कोयता गँगमुळे पुणे शहरातील नागरिक चांगलेच दहशतीत आहेत. आता पुण्यातील चोरट्यांची हिंमत पोलीस ठाण्यात चोरी करण्यापर्यंत वाढली आहे.

पुणे तेथे काय उणे असे नेहमी म्हटले जाते. मग पुणे शहरातील चोर गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असताना, यापासून पोलिस मुख्यालयही वाचलेले नाही. चोरट्यांनी थेट पोलीस मुख्यालयाकडेच वक्रदृष्टी वळवली आहे. चोरट्यांनी पुणे पोलीस ग्रामीण मुख्यालायत चोरी केली आहे. यामुळे पुण्यात पोलीस ठाणीच चोरट्यांपासून सुरक्षित नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कितीचा ऐवज झाला चोरी
पुणे पोलिसांच्या ग्रामीण मुख्यालयाच्या आवारात चोरी करण्याचा प्रकार घडला आहे. पोलीस मुख्यालयातून 80 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी ज्या ठिकाणी सतत पोलीस असतात त्या ठिकाणी चोरीचे धाडस केले आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या आवारातच चोरी झाल्याने चर्चा सुरु झाली आहे.

पोलिसांना घ्यावा लागणार चोरांचा शोध..

गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची सर्वात महत्वाची भूमिका असते. त्यासाठी पोलिस रोज रात्री शहरात नियमित पेट्रोलिंग करत असतात. पोलिसांची पेट्रोलिंग सुरु असताना अनेक चोर पकडले गेले आहेत. काही वेळा चोरी, दरोडेही रोखले गेले आहेत. परंतु ज्या ठिकाणी पोलिसांचा २४ तास बंदोबस्त असतो, पोलिसांची मोठा ताफा असतो, त्या ग्रामीण पोलीस मुख्यालयात चोरी झाली आहे. यामुळे पुणे शहरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. आता पोलीस मुख्यालयातील चोरीचे आरोपी शोधण्याचे काम करण्याची जबाबदारी चतु:शृंगी पोलीस ठाण्यावर आली आहे. पोलीस ठाण्यात चोरी करणारे हे चोरी किती दिवसांत सापडतात? हे आता पाहावे लागणार आहे.

Previous Post

हेरले येथील चोरीचा छडा; मुद्देमालासह चोरट्यास अटक

Next Post

जत प्रांताधिकारी व मुख्याधिकारी दोन्ही जागा रिक्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जत प्रांताधिकारी व मुख्याधिकारी दोन्ही जागा रिक्त

जत प्रांताधिकारी व मुख्याधिकारी दोन्ही जागा रिक्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group