जत (प्रतिनिधी) : जत तालुका विस्ताराने मोठा आहे. तसेच अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे गतीने होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत सध्या प्रांताधिकारी व मुख्याधिकारी या पदावर प्रभारी नियुक्त्या केल्या आहेत. आता प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांच्या नेमणुकीसाठी सुद्धा जतकरानी रास्ता रोको करावा का ? असा सवाल प्रवीणशेठ गडदे यांनी केला आहे.
ते म्हणाले की, तालुक्यात महसूल विभागाच्या महत्वाच्या व मुख्य अशा कार्यालयात प्रांताधिकारी पदसुद्धा प्रभारी आहे. अनेक शेतकरी, व्यापारी नागरिकांची विविध शासकीय कामे ठप्प आहेत. वेळेत कामे होत नसल्याने अनेकांच्या आहेत. जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद हे सध्या प्रभारी आहे. सुमारे ५० हजाराच्या वर लोकसंख्या असणाऱ्या जत नगरपरिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळू शकत नाही. त्यामुळे शहरातील अनेक नागरिकांची, विद्यार्थ्यांची, व्यापाऱ्यांची कामे वेळेत होत नाहीत. तसेच तालुक्याचे महत्वाचे अशा प्रांताधिकारी कार्यालयात अनेक शेतकरी, व्यापारी नागरिकांची विविध शासकीय कामे ठप्प आहेत. वेळेत कामे होत नसल्याने अनेकांच्या अडचणी वाढत आहेत.


