सांगली ( प्रतिनिधी) सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रास जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज असे नाव देण्यात आले आहे हा नामकरण सोहळा सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत रविवारी संपन्न झाला.
महापालिकेचे मध्यवर्ती निदान केंद्र हे त्रिकोणी बागेची डॉक्टर देशपांडे उद्यानाशेजारी सुरू करण्यात आले आहे. या मध्यवर्ती निदान केंद्र जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज असे नाव देण्याचा ठराव महापालिकेच्या सभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. रविवारी सांगलीचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार, काँग्रेस नेते विशाल पाटील , पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निदान केंद्राचे जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज असे नामकरण सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास मनपाच्या सभागृह नेते भारती दिगडे, राष्ट्रवादीचे नेते संजय बजाज, भाजपा नेते मोहन व्हंनखंडे, नगरसेवक विनायक सिंहासने, विष्णु माने, राजेंद्र कुंभार, संतोष पाटील, नगरसेविका गीता सुतार, गायत्री कल्लोळी, पवित्रा केरिपाळे, गीतांजली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर, लिंगायत बोर्डींगचे सुधीर सिंहासने, सुशील हडदरे, अशोक पाटील, प्रा. शिवपुत्र आरबोळे, गजेंद्र कल्लोळी , वीरेंद्र थोरात, मनपाचे उपआयुक्त राहुल रोकडे, डॉ. वैभव पाटील, डॉ. रवींद्र ताटे, सहायक आयुक्त सचिन सागावकर, मध्यवर्ती निदान केंद्र प्रमुख काका हलवाई आदीसह मनपाचे वैद्यकीय अधिकारी, निदान केंद्राचे अधिकारी कर्मचारी , लिंगायत समाज बांधव उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी तर आभार सभागृह नेत्या भारती दिगडे यांनी मानले. सुत्रसंचालन सतीश मगदूम यानी केले.

