• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गांधीनगरात विनयभंग केला म्हणून डोक्यात घातला दगड

Admin by Admin
July 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
गांधीनगरात विनयभंग केला म्हणून डोक्यात घातला दगड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गांधीनगर/प्रतिनिधी : पीडित महिलेचा विनयभंग होत असताना तिने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मारलेल्या दगडाने निखिल सुनील कांबळे हा जखमी झाला असून परस्पर विरोधी तक्रारी गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. पण गांधीनगर पोलिसांनी पीडित महिलेवरच कडक कलम लावल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, करवीर तालुक्यातील गांधीनगर रेल्वे स्टेशन नजीक गडमुडशिंगी गावच्या हद्दीतील येडेकर मळ्यात राहणारी पीडित महिला गांधीनगर मध्ये धुनी भांडीची काम करते. शनिवार दिनांक 22 रोजी दुपारी पावणेतीन वाजता ही पीडित महिला रूप संगम साडी दुकानाजवळ असणाऱ्या बोळातून घरी जात होती. याचवेळी निखिल सुनील कांबळे हा पाठीमागून आवाज देत जवळ येऊन पीडीतेचा विनयभंग केला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी पिढीतेने दगड मारल्याने तो दगड निखिल कांबळे यांच्या डोक्यात लागला. यावेळी मोठ्या प्रमाणात आरडा ओरडा झाल्याने नागरिक गोळा झाले. यावेळी निखिल कांबळे हा पळून गेला. तर काही वेळाने निखिल कांबळे हा हातात शस्त्र घेऊन रेडेकर मळ्याकडे धावत असल्याचे अनेकांनी पाहिले. याबाबत पीडित महिलेने निखिल कांबळे यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर निखिल कांबळे यांनेही पीडित महिलेसह त्याच्या पतीच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात दगडाने मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे.

दोन्ही कडून तक्रारी दाखल झाल्यांनतर गांधीनगर पोलिसांनी दोघांच्या वर ही तक्रारी दाखल करून घेतली असून स्वतःला वाचवण्यासाठी पीडित महिलेने केलेल्या दगडफेकी बाबत गांधीनगर पोलिसांनी पिडीतेवर ज्यादा कलम लावून अन्याय केल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

Previous Post

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घेतला पूर बाधित गावांचा आढावा

Next Post

शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात

शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group