• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

उमदी पोलीस अँक्शन मोडवर ; आंध्रातून तस्करी केला जाणारा १४ लाखाचा गांजा जप्त, तिघांना अटक

Admin by Admin
July 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
उमदी पोलीस अँक्शन मोडवर ; आंध्रातून तस्करी केला जाणारा १४ लाखाचा गांजा जप्त, तिघांना अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उमदी प्रतिनिधी / आंध्र प्रदेशातून विक्रीसाठी आणलेला १४ लाख ६५ हजाराचा ८६ किलो गांजा उमदी पोलीसांनी स्विप्ट मोटारीचा पाठलाग करून पकडला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून गांजा पुरवठादार व खरेदीदारांसह पाच जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंध्र प्रदेशातून स्विप्ट डिझायर मोटारीतून (एमएच १३ एझेड १३७१) गांजा विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती उमदी पोलीसांना मिळाली. या माहितीनुसार अमोघसिध्द मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर सहायक निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने सापळा लावला. यावेळी मोटारीच्या डिकीमधून एक पोते काढून घेत असताना इफतेखारूल उर्फ अरबाज बाबासाहेब शेख (वय २६ रा.राजूनगर, जुना कुपवाड रोड) याला ताब्यात घेण्यात आले.

याचवेळी मोटारीत समोर बसलेल्या दोघांनी मोटारीसह सोलापूर महामार्गावरून चडचणच्या दिशेने पलायन केले. ही मोटारी इचगाव पथकर नाक्यावर अडवून झडती घेतली असता यामध्ये पोत्यामध्ये भरण्यात आलेला सुका गांजा आढळला. त्याचे वजन ८६ किलो ३०५ ग्रॅम असून त्याचे मूल्य १४ लाख ६७ हजार ८३५ रु. आहे. मोटारीतून पलायनाच्या प्रयत्नात असलेले प्रतिक कांबळे (वय २६ रा. नागराळे, ता. पलूस) आणि मोहसीन मेहबूब कागजी (वय २८ रा. शंभरफुटी सांगली) आणि शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे.

गांजा विक्रीसाठी आंध्रप्रदेशातून प्रकाश भाई (रा. राजमंद्री, आंध्र प्रदेश) याच्याकडून आणण्यात आला असल्याचे अटक केलेल्या तिघांनी सांगितले. तर गांजाची खरेदी करणारा पिंटू माळी हा सांगलीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीसांनी अटक करण्यात आलेल्या तिघासह पाच जणाविरूध्द उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई उमदी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंंदे, उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, शिरीष शिंदे, नामदेव काळेल, प्रशांत कोळी, नितीन पलुसकर, आप्पासाहेब हाके, महादेव मडसनाळ, मनिष कुमरे, इंद्रजित गोदे, सोमनाथ पोटभरे, अमोल पाटील, सोपान भंडे, वहिदा मुजावर, समिक्षा म्हेत्रे आदींनी केली.

Previous Post

बेडगची बदनामी करणाऱ्यांचा ग्रामस्थांकडून निषेध; गाव बंदचा निर्णय : “या” दिवशी मिरजेतून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा.

Next Post

“हे” सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“हे” सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी..!

"हे" सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group