• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | अहमदनगरमध्ये खासगी व्यक्तीच्या घरात सापडला लष्कराचा दारुगोळा-स्फोटकांचा साठा

Admin by Admin
July 22, 2023
in क्राईम
1 min read
0
मोठी बातमी | अहमदनगरमध्ये खासगी व्यक्तीच्या घरात सापडला लष्कराचा दारुगोळा-स्फोटकांचा साठा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर : नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथील एका व्यक्तीच्या घरात लष्कराचा दारुगोळा, स्फोटकांचा साठा आढळून आला असून, आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व पुणे येथल सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स विभागाच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे.

आरोपीकडील सर्व दारुगोळा व स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिनकर त्रिंबक शेळके (वय ६५, रा. कर्जुने खारे) असे आरोपीचे नाव आहे. खारे कर्जुने गावाला लागूनच सैन्याचे युद्ध सराव क्षेत्र आहे.

दिनकर शेळके हा त्यांचे राहते घरी भारतीय सैन्य दलात वापरला जाणारा दारुगोळा व स्फोटक पदार्थ अवैधरित्या कब्जता बाळगतो आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पुणे येथील सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स विभाग, दहशतवाद विरोधी शाखा, बीडीडीएस अहमदनगर व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी खारे कर्जुने येथे शेळके याच्या घरी छापा टाकला.

पथकाने दिनकर शेळके यास ताब्यात घेऊन पत्र्याच्या शेडमध्ये आडगळीच्या सामानाखाली ठेवलेला दारुगोळा, स्फोटके हस्तगत केली. यामध्ये १८ टॅन्क राऊंड, ५ मोटार राऊंड, ८ ॲम्युनेशन पिस्टल राऊंड, १६ पिस्टल राऊंड, ४० स्विचेस, लाल पिंवळी वायर बंडल व २५ किलो टीएनटी पावडर अशा मुद्देमालाचा समावेश आहे. आरोपी विरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्फोटक पदार्थ अधिनियम कलम ४ व भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

दूधसागर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी

Next Post

बेडगची बदनामी करणाऱ्यांचा ग्रामस्थांकडून निषेध; गाव बंदचा निर्णय : “या” दिवशी मिरजेतून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बेडगची बदनामी करणाऱ्यांचा ग्रामस्थांकडून निषेध; गाव बंदचा निर्णय : “या” दिवशी मिरजेतून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा.

बेडगची बदनामी करणाऱ्यांचा ग्रामस्थांकडून निषेध; गाव बंदचा निर्णय : "या" दिवशी मिरजेतून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group