कोल्हापुरात चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. २ जून ते १६ जुलै २०२३ या काळात वेळोवेळी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील संशयित आरोपीस लक्ष्मीपूरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शैलेंद्र सखाराम पाटील (वय ४१) असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने २५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

