• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता “या” तारखेला खात्यात होणार जमा

Admin by Admin
July 22, 2023
in सामाजिक
1 min read
0
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पीएम किसानचा 14 वा हप्ता जारी करणार आहेत. या योजनेचा 14वा हप्ता 28 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल. याबाबत अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा मागील हप्ता 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातून जारी करण्यात आला होता. पीएम किसान निधी योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. केंद्र सरकार हे पैसे 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये देते. प्रत्येक हप्ता 4 महिन्यांत जारी केला जातो. त्याचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्चपर्यंत पाठविला जातो.

शेतकरी आपले नाव पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपासू शकतात. येथे होमपेजवर फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर लाभार्थी स्थितीवर क्लिक करा. यानंतर पुढील पानावर मागितलेली माहिती द्यावी लागेल. त्यानंतर शेतकरी योजनेसाठी पात्र असेल तर नाव यादीत दिसेल. याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकरी टोल फ्री क्रमांक 155261 वर संपर्क साधू शकतात. या क्रमांकावर लाभार्थी यादीत नाव आहे की नाही? ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. खात्यात पैसे येतील की नाही? अशी सर्व माहिती तुम्हाला मिळू शकते.

पीएम किसानचा या लोकांना लाभ नाही
एखाद्या शेतकऱ्याने जमीन भाडेतत्वावर घेतली असेल. मग अशा परिस्थितीतही त्याला योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. पीएम किसानचा लाभ मिळण्यासाठी जमिनीची मालकी आवश्यक आहे. शेतकरी किंवा कुटुंबातील कोणी घटनात्मक पदावर असेल, तर त्याला लाभ मिळणार नाही. एवढेच नाही तर शेती काम करीत असेल तरी डॉक्टर, इंजिनीअर, सीए, वास्तुविशारद, वकील अशा व्यावसायिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासोबतच 10,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार नाही.

Previous Post

सांगलीतील शिराळ्यात एकाच रात्रीत 23 घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास; 6 ते 7 चोरटे गावातून फिरताना सीसीटीव्हीत कैद..

Next Post

कोल्हापुरात चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमास अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोल्हापुरात चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमास अटक

कोल्हापुरात चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमास अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group