• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवत तरुणीला केले गर्भवती; बाळ झाल्यानंतर दिला लग्नाला नकार

Admin by Admin
July 21, 2023
in क्राईम
1 min read
0
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवत तरुणीला केले गर्भवती; बाळ झाल्यानंतर दिला लग्नाला नकार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यातील तरुणीशी लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंधातून तरुणी गर्भवती राहिली आणि तिला बाळदेखील झाले. त्यानंतर मात्र, या तरुणाने तरुणीशी लग्न करण्यास नकार देऊन तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जबरदस्तीने शारीरिक संबंध

याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अमोल हिरोजी भागडे (वय २८, रा. भागडेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत २२ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. गेल्या वर्षात हा प्रकार घडला आहे. तक्रारदार तरुणी व अमोल हिची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे. तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. पण, तरुणीने नकार दिला असता तिला आपले संबंध तुझ्या कुटुंबाला सांगेल, अशी धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

शारीरिक संबंधातून निर्माण झाले बाळ तरीही लग्नास नकार

यातून तरुणी गर्भवती राहिली आणि नुकतीच आईदेखील झाली. त्यानंतर अमोलने तिच्याशी लग्न करण्यास नकार देत तिची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुण्यात महिलांची छेडछाड सुरूच असल्याचे दिसत असून, मगरपट्टा सिटीतील एका नामांकित थेटरमध्ये पतीसोबत चित्रपट पाहत असलेल्या विवाहितेचा तीन तरुणांनी छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेला बसलेल्या शिटच्या पाठीमागे बसून त्यांचे केस ओढले. पतीने जाब विचारल्यानंतर त्यांना तरुणांनी अश्लील शिवीगाळ केली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मोहम्मद आदिल (वय २२), अफजल अली (वय २०) व त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

मगरपट्टा सिटीमधील नामांकित थिअटरमध्ये धक्कादायक प्रकार

याबाबत २५ वर्षीय विवाहित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार मगरपट्टा सिटी येथील एका नामांकित थेटरमध्ये चित्रपट पाहण्यास आलेल्या होत्या. चित्रपट पाहत असताना त्यांच्या खुर्चीच्या पाठीमागे बसलेल्या आरोपी मोहम्मद याने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला व केस ओढले. विवाहितेने आरडाओरडा केला.

Previous Post

तासगावात पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या बदलीनंतर फटाक्यांची आतषबाजी

Next Post

महायुतीत खळबळ | सांगलीत पहिली ठिणगी : अजित पवार गट आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महायुतीत खळबळ | सांगलीत पहिली ठिणगी : अजित पवार गट आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने..!

महायुतीत खळबळ | सांगलीत पहिली ठिणगी : अजित पवार गट आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group