खबऱ्या प्रतिनिधी / सांगलीत महापालिकेच्या मासिक सभेत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नगरसेवकात जोरदार वाद झाला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या हातातील फाईली भाजपा नगरसेवकाने हिसकावत फाडण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणखी 8 बड्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याशिवाय सर्व मंत्र्यांसाठी खातेवाटपदेखील करण्यात आलं आहे. आता सरकारमध्ये भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटदेखील सहभागी झाला आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 पेक्षा जास्त आमदारांनी पाठिंबा दिला आहे. अजित पवार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. आता सरकारमध्ये तीन मित्र पक्ष आहेत. पण सांगलीत वेगळाच प्रकार बघायला मिळाला. सत्ताधारी मित्र पक्षातील दोन नगरसेवकांमध्येच जोरदार राडा झाला. त्यामुळे या प्रकरणाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नगरसेवकामध्ये जोरदार वादावादी झाली. हा वाद इतका शिगेला गेला की माजी महापौर आणि भाजप नगरसेवक विवेक कांबळे यांनी राष्ट्रवादी नगरसेवकाच्या हातातील फाईल फाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.


