• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खळबळजनक घटना! कोंबडीचं रक्त लावून बलात्काराचा केला आरोप; हनी ट्रॅपमधून ३ कोटी उकळले..

Admin by Admin
July 18, 2023
in क्राईम
1 min read
0
खळबळजनक घटना! कोंबडीचं रक्त लावून बलात्काराचा केला आरोप; हनी ट्रॅपमधून ३ कोटी उकळले..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Honey Trap in Mumbai: मुंबई पोलिसांनी दीड वर्ष जुन्या हनी ट्रॅप केसचा छडा लावला आहे. पोलिसांनी ही खटल्याचा छडा लावताना चार्जशीट दाखल करत खळबळजनक खुलासा केलाय. चार्जशीटनुसार, एका महिलेने ६४ वर्षीय व्यावसायिकावर मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावला होता आणि दावा केला होता की बलात्काराच्या प्रयत्नात ती जखमी देखील झाली होती.

दीड वर्षानंतर मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये दावा केलाय की त्या महिलेने बलात्काराच्या प्रयत्नात विरोध करताना जखमी झाल्याचे नाटक केलं होतं आणि पोलिसांना जे हाताला लागलेलं रक्त दाखवलं होतं ते मुळात कोंबडीच रक्त होतं.

चार्जशीटमध्ये पोलिसांनी म्हटलंय की मोनिका भगवान उर्फ देव चौधरी नावाच्या महिलेने आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत हनी ट्रॅपचा कट रचला आणि त्या व्यावसायिकाकडून ३ कोटी रुपये उकळले होते.

गुन्हे शाखेच्या युनिट १०ने मागच्या आठवड्यात मोनिका चौधरी आणि तिचे तीन सहकारी अनिल उर्फ आकाश चौधरी, लुबना वजीर उर्फ सपना आणि ज्वेलर मनिष सोदी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलंय.

मुंबई गुन्हे शाखेच्या अनुसार, कोल्हापुरच्या एका व्यापाऱ्याशी या आरोप्यांमधील अनिल चौधरी याची पहिली भेट २०१६मध्ये गोवा येथे झाली होती. या दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली जेव्हाही व्यापारी एखाद्या मिटींगसाठी मुंबईला यायचा तेव्हा तो अनिल चौधरीला नक्की फोन करायचा.

पोलिसांनी खुलासा केला की, ब्लॅकमेलिंगचे हे सत्र २०१७पासून सुरु झाले, जेव्हा अनिल चौधरी आणि सपनाने व्यावसायिकाशी मैत्री केली. त्यांनी त्या व्यापाराच्या संपत्तीचा आढावा घेतला आणि त्याला फसवण्याची योजना आखली.

पोलिसांच्या चार्जशीटमध्ये पुढे सांगण्यात आलं की, जेव्हा व्यावसायिक २०१९मध्ये मुंबईमध्ये होता आणि एका पंचतारांकित हॉटेलमध्ये डीनरसाठी बोलवलं. अनिल यावेळी लुबना वजीरबरोबरच मोनिका देव नावाच्या आणखी एका महिलेला घेऊन गेला.

मोनिकासोबत मनिष सोदी हाही होता. मग तो फोन आल्याचा दिखावा करत बाहेर आला, पण मोनिका आणि लुबना तिथेच होत्या.

काही वेळानंतर मोनिकाने गोंधळ घालायला सुरुवात केली की व्यावसायिकाने तिच्यासोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने तिला मारहाणही केली.

यावेळी मोनिकाने गोंधळ करत व्हिडीओही शूट केला. या व्हिडीओच्या आधारे ही गॅंग या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत होती.

Previous Post

मंडळ अधिकारी व तलाठी यांनी केला खुलासा सादर

Next Post

मिरज | देव्हाऱ्यातील मुर्ती चोरणाऱ्या वृध्द महिलेला अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज | देव्हाऱ्यातील मुर्ती चोरणाऱ्या वृध्द महिलेला अटक

मिरज | देव्हाऱ्यातील मुर्ती चोरणाऱ्या वृध्द महिलेला अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group