प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांच्याकडे लक्ष
कडेगाव :- मोहिते वडगाव तलाठी व मंडळ अधिकारी चिंचणी यांनी आज कडेगाव प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांच्याकडे त्यांच्या आदेशानुसार खुलासा सादर केला असल्याचे वृत्त खबऱ्याला मिळाले असून यात त्यांनी नक्की काय खुलासा केला आहे हे समजू शकले नाही. मोहिते वडगाव येथील दुबार फेरफार प्रकरणात राष्ट्रवादी चे विधानसभा क्षेत्राध्यक्ष तथा आंदोलन फेम डी एस देशमुख यांनी निवेदन देत आंदोलन कारवाई ची मागणी केली होती.त्यावर प्रांताधिकारी डॉ देशमुख यांनी तात्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश मंडळ अधिकारी चिंचणी व तलाठी मोहिते वडगाव यांना दिले होते. यात आता दोघांनीही खुलासा सादर केल्याचे वृत्त असून याबाबत प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख काय करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कडेगाव उपविभागातील काही गावांमध्ये बेकायदेशीर पणे चालू असलेल्या दुबार नोंदी बाबत गोपनीय खबऱ्याने सडेतोड वृत्ताची मालिका सुरु केल्यानंतर राष्ट्रवादी चे विधानसभा क्षेत्राध्यक्ष तथा आंदोलन फेम डी एस देशमुख यांनी मोहिते वडगाव येथील दुबार फेरफार प्रकरण शोधून काढत पुराव्यासह प्रांताधिकारी डॉ देशमुख यांचेकडे सादर करून कारवाई बाबत निवेदन दिलं होतं अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेऊ असा ईशारा दिला होता. यावर प्रांताधिकारी डॉ देशमुख यांनीही तात्काळ नोटीस काढून मंडळ अधिकारी चिंचणी व तलाठी मोहिते वडगाव यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज दोघांनीही खुलासा सादर केला असल्याचे वृत्त खबऱ्याला मिळाले असून सदर खुलासा टपालात जमा केला असून काय खुलासा सादर केला आहे याबाबत समजू शकले नाही.
आता खुलासा प्राप्त होताच प्रांताधिकारी डॉ देशमुख काय निर्णय घेतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. तर डॉ देशमुख यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी चे विधानसभा क्षेत्राध्यक्ष तथा आंदोलन फेम डी एस देशमुख काय भूमिका घेतात हे पाहणे ही महत्वाचे ठरणार आहे.

