• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकींग | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी दाखल, विरोधी पक्षांच्या गोटातही हालचाली…

Admin by Admin
July 13, 2023
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकींग | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी दाखल, विरोधी पक्षांच्या गोटातही हालचाली…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. फडणवीस रात्री इतक्या उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. फडणवीस रात्री इतक्या उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस यांच्या भेटीचं कारण सध्या तरी समजू शकलेलं नाही. पण राज्यात मंत्रिमंडळाचा विस्ताराचा आणि खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर सातत्याने बैठकांचं सत्र सुरु आहे. एकीकडे मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. तसेच खातेवाटप उद्या जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असं असताना आज रात्री फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत.

गेल्या दहा दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप विषयी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. सातत्याने बैठका होत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. विशेष म्हणजे त्याआधी देखील या बैठका पार पडल्या होत्या.

याशिवाय आजदेखील बैठकांचं संत्र सुरुच होतं. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची आज सकाळीसुद्धा वर्षावर बैठक पार पडलेली. त्यानंतर अजित पवार यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर आता रात्री उशिरा फडणवीस आणि शिंदे यांच्यात आता बैठक होतेय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ठाण्यात कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते ठाण्यातील निवासस्थानी आले होते. तर भाजपचं आज भिवंडीत एक दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचं धडाकेबाज भाषण झालं. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची तीन तास बैठक चालली. या बैठक आटोपल्यानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली.

विरोधी पक्षांच्या गोटातही जोरदार हालचाली..

विशेष म्हणजे एकीकडे सत्ताधाऱ्यांच्या गोटात मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि खातेवाटपारुन सातत्याने खलबतं सुरु असताना तिकडे विरोधी पक्षांच्या गोटातही जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

यावेळी मल्लिकार्जुन खर्गेंनी विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे असावं, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय काँग्रसचे प्रदेशाध्य नाना पटोले उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी नागपूरहून रवाना होणार आहेत. दिल्लीत उद्या विरोधी पक्षनेता ठरवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Previous Post

‘मातोश्री’च्या बंद खोलीत नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण किस्सा सांगितला.

Next Post

मिरजेत नागरी वस्तीत मोराचा मृत्यू; वन विभागाकडून उत्तरीय तपासणी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत नागरी वस्तीत मोराचा मृत्यू; वन विभागाकडून उत्तरीय तपासणी

मिरजेत नागरी वस्तीत मोराचा मृत्यू; वन विभागाकडून उत्तरीय तपासणी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group