• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘मातोश्री’च्या बंद खोलीत नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण किस्सा सांगितला.

Admin by Admin
July 13, 2023
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
‘मातोश्री’च्या बंद खोलीत नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण किस्सा सांगितला.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा 2019 च्या विधानसभा निवडणुकांवेळी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत नेमकं काय घडलं होतं? याबाबतचा खुलासा केला आहे.

ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात 2019 मध्ये झालेल्या बैठकीचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पोहरादेवीची शपथ घेऊन भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, असं म्हणाले. त्याला आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. भाजपचं आज भिवंडीत एकदिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलेलं. यावेळी देवेंद्रे फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड बैठकीत काय चर्चा झाली याबाबत सविस्तर माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय-काय म्हणाले?
“बाळासाहेबांच्या खोलीबद्दल ते वारंवार सांगतात, त्याच खोलीमध्ये अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. मला त्या ठिकाणी बोलावलं. ते त्याठिकाणी बसले. मला त्यांनी आधीच सांगितलं होतं की, मला काही गोष्टी बोलायच्या आहेत. काही गोष्टी मनात आहेत त्या बोलायच्या आहेत. मी म्हटलं नक्की बोला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं.

“मी अमित शाह यांना सांगितलं होतं. ते त्या खोलीत बसले. दहा-पंधरा मिनिटं बसले असतील. त्यानंतर मला बोलावलं. म्हणाले, आता सगळ्या गोष्टी दूर झालेल्या आहेत. आता आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की, पत्रकार परिषदेत तू एकट्यानेच बोलायचं, आम्ही काही बोलणार नाहीत. प्रश्नोत्तरं नको. मग पत्रकार परिषदेत काय बोलायचं? याची रिअलसल झाली”, असं फडणवीसांनी सांगितलं.

Previous Post

जनतेला वाऱ्यावर सोडून मलईदार खात्यांसाठी मारामारी ; महाराष्ट्रात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती; तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा, नाना पटोले यांची मागणी

Next Post

मोठी ब्रेकींग | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी दाखल, विरोधी पक्षांच्या गोटातही हालचाली…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकींग | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी दाखल, विरोधी पक्षांच्या गोटातही हालचाली…

मोठी ब्रेकींग | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी दाखल, विरोधी पक्षांच्या गोटातही हालचाली...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group