• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत नागरी वस्तीत मोराचा मृत्यू; वन विभागाकडून उत्तरीय तपासणी

Admin by Admin
July 14, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरजेत नागरी वस्तीत मोराचा मृत्यू; वन विभागाकडून उत्तरीय तपासणी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरजेतील विद्यानगर येथील चौगुले पार्कजवळील एका सदनिकेच्या पार्किंगमध्ये मोराचा मृतदेह आढळून आला. राष्ट्रीय पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने नागरिकांनी तातडीने वनविभागास संपर्क केला.

वनविभागने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. दुपारी उत्तरीय तपासणी करण्यात आली असून मोराचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे समोर आले. मोराच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिरज शहराच्या उत्तरेला विद्यानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती नाही. शेतीचा भाग असल्याने मोर, लांडोरांची संख्या अधिक आहे. या भागात नागरी वस्ती वाढत चालल्याने मोरांचा अधिवास संपुष्टात आला आहे. सकाळी सातच्या सुमारास येथील चौगुले पार्कजवळ महालक्ष्मी सदनिका आहे. त्याठिकाणच्या पार्किंगमध्ये मोर मृतावस्थेत आढळून आला. काही प्राणीमित्रांनी पाहणी केली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली.

वन विभागाचे पथक तातडीने दाखल झाले. प्रथमदर्शनी मोराच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची इजा नव्हती. वनविभागाकडून उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात कोणतीही विषबाधा किंवा शिकारीचा प्रकार झाला नसल्याचे समोर आले. मोराचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

Previous Post

मोठी ब्रेकींग | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी दाखल, विरोधी पक्षांच्या गोटातही हालचाली…

Next Post

महाराष्ट्र पुन्हा हादरला; बुलढाण्यात आठ जणांनी केला महिलेवर सामूहिक बलात्कार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महाराष्ट्र पुन्हा हादरला; बुलढाण्यात आठ जणांनी केला महिलेवर सामूहिक बलात्कार

महाराष्ट्र पुन्हा हादरला; बुलढाण्यात आठ जणांनी केला महिलेवर सामूहिक बलात्कार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group