• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राष्ट्रवादीतल्या फुटीचे विट्यात पडसाद

Admin by Admin
July 12, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
राष्ट्रवादीतल्या फुटीचे विट्यात पडसाद
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर राष्ट्रवादीतही अजित पवार यांनी बंड केले. त्यांचे हे बंड सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना पाहायला मिळत असून राष्ट्रवादीतही अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीतल्या या फुटीचे आता विट्यात पडसाद उमटत आहेत.

माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी शरद पवार यांना कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी आले असता आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरीकडे पाटील यांचे चिरंजीव व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मात्र अजित पवार यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्याचे समजत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी फूटीचा मुद्दा थेट गाव-गल्ली पातळीपर्यंत पोहोचला असल्याचे स्पष्ट होत आहे.

विटा नगर पालिका इमारतीच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावले होते. काही कार्यकर्त्यांनी एका बॅनरवर त्यांच्या फोटो शेजारी शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो लावले आहेत. शिवाय या फलकावर ‘आता वेळ निर्णयाची, जे संकटात आपल्या सोबत, आपण जाऊ त्यांच्या सोबत’ असे वाक्य लिहिल्याने शहरासह संपूर्ण मतदारसंघात याची जोरदार चर्चा सुरू आहे. विट्याच्या पाटील गटांतर्गतही लोकशाहीचा मुद्दा सुरू झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Previous Post

कडेगाव तालुक्यातील दुबार फेरफार प्रकरणात प्रांताधिकारी डॉ विजय देशमुख ॲक्शन मोडमध्ये

Next Post

कडेगाव तालुक्यातील आणखी एका गावात दुबार फेरफार प्रकरण?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगाव तालुक्यातील आणखी एका गावात दुबार फेरफार प्रकरण?

कडेगाव तालुक्यातील आणखी एका गावात दुबार फेरफार प्रकरण?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group