पलूस तालुक्यातील बहुसंख्य दुबार फेरफार बाबत मात्र अजूनही शांतताचं…
कडेगाव:- कडेगाव उपविभागातील कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगाव येथील दुबार फेरफार प्रकरणात कडेगावचे धडाकेबाज प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख सध्या ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. त्यांनी चिंचणी मंडळ अधिकारी व मोहिते वडगाव यांच्याकडून दुबार फेरफार प्रकरणबाबत आठ दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचा आदेश मंगळवार दि 11 जुलै रोजी काढला आहे. कडेगाव तालुक्यात कारवाईला सुरुवात झाली असली तरी पलूस तालुक्यातील बहुसंख्य दुबार फेरफार बाबत अजूनही शांतताच दिसून येत आहे.
गोपनीय खबऱ्याने कडेगाव उपविभागातील दुबार नोंदी बाबत सडेतोड वृत्तांकन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष आणि आंदोलन फेम डी एस देशमुख यांनी माहिती घेत पहिले दुबार फेरफार प्रकरण उजेडात आणत त्याबाबत प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांना पुराव्यासह निवेदन सादर करीत दोषींवर कारवाई ची मागणी केली व न झाल्यास आंदोलनाचा इशारा ही दिला होता. यावर चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन डॉ देशमुख यांनी दिले होते.
त्यानुसार निवेदनाचा संदर्भ घालून सदर प्रकरणी आपला लेखी खुलासा सदरची नोटीस मिळालेपासून 8 दिवसांचे आत समक्ष सादर करावा. वेळेत खुलासा प्राप्त झाला नाही अथवा तो समाधानकारक नसलेस आपणां विरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल 1981 नुसार शिस्तंभंग विषयक कारवाई केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी. अशी नोटीस चिंचणी मंडळ अधिकारी व तलाठी मोहिते वडगाव यांना काढली आहे.
गोपनीय खबऱ्याच्या दणक्यानंतर कडेगाव तालुक्यात दुबार नोंदीबाबत कारवाई सुरु झाली असली तरी पलूस तालुक्यात अजूनही याबाबत संपूर्ण शांतता आहे. पलूस तालुक्यात काही तलाठी व मंडळ अधिकारी यांनी संगणमताने बेकायदेशीर पणे बहुसंख्य नोंदी बेकायदेशीर पणे दुबार धरल्या आहेत. याकडे कोणीतरी लक्ष देण्याची गरज असून यामध्ये सुद्धा कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


