• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत चाकूचा धाक दाखवून चित्रीकरण करीत महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार ; फिर्यादी अल्पवयीन..

Admin by Admin
July 11, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
बनावट कागदपत्राच्या आधारे घर हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर फसवणुकीचा गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरजेतील एका महाविद्यालयीन अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी शैलेश प्रमोद देवकुळे (रा. मंगळवार पेठ, मिरज) याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तसेच संशयिताने चाकूचा धाक दाखवून चित्रीकरण केल्याचे देखील पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडिता ही मिरज शहरात राहते. ती अल्पवयीन आहे. ती एका महाविद्यालयात शिक्षण घेते. सोशल मीडियातून तिची आणि संशयिताची डिसेंबर 2022 मध्ये ओळख झाली; परंतु समोरील व्यक्ती मुलगी असल्याचा भास झाल्याने पीडितेने त्याच्यासोबत चॅटिंग सुरू केले. त्यानंतर तो मुलगा असल्याचे समोर आले. त्यानंतर संशयिताने पीडितेशी मैत्री केली. दरम्यानच्या काळात त्याने पीडितेकडे प्रेम व्यक्त केले. त्यावेळी पीडितेने आमच्या घरात असले चालत नाही, असे सांगून नकार दिला.

त्यानंतर संशयिताने शहरात एका ठिकाणी पीडितेला बोलावून घेतले. फिरायला जाण्याचा बहाणा करत मोटारसायकलवरून तिला घरी नेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण लग्न करू, असे सांगून त्याने तिच्या इच्छेविरूद्ध शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा एका डोंगरावर नेऊन इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. त्यावेळी संशयिताने चाकूचा धाक दाखवत मोबाईलमध्ये या प्रकारचे चित्रीकरण देखील केले. हे चित्रीकरण घरी दाखवण्याची धमकीही पीडितेला दिली.

दरम्यान, घडल्या प्रकाराबाबत पीडितेने कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार बलात्कारासह अन्य कलमानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिरज शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

केंद्राच्या पीजीआय अहवालात सातारा राज्यात अव्वल..

Next Post

कडेगाव तालुक्यातील दुबार फेरफार प्रकरणात प्रांताधिकारी डॉ विजय देशमुख ॲक्शन मोडमध्ये

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगाव तालुक्यातील दुबार फेरफार प्रकरणात प्रांताधिकारी डॉ विजय देशमुख ॲक्शन मोडमध्ये

कडेगाव तालुक्यातील दुबार फेरफार प्रकरणात प्रांताधिकारी डॉ विजय देशमुख ॲक्शन मोडमध्ये

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group