• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पलूसमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांत राडा : जोरदार हाणामारी : कुऱ्हाड, लोखंडी पाईपचा वापर.

Admin by Admin
July 5, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पूर्वी झालेल्या वादातून विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा झाला. एका गटाने कुर्‍हाडीने व लोखंडी पाईपने केलेल्या हल्ल्यात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.सोहम संजय पाटील (19), वेदांत संतोष फाळके (17, रा. मायाक्का मंदिर जवळ पलूस) अशी जखमींची नावे आहेत.

वैभव ऊर्फ गुंडा कोळी,अभिजित तांबारे, श्री मोहिते, पार्थ मोहिते, किरण निकम, ओंकार कदम (सर्व रा. महादेव मंदिर परिसर, पलूस) अशी संशयितांची नावे आहेत. यांच्याविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जखमी सोहम पाटील यांनी फिर्याद दिली . ही घटना सोमवारी (दि. 3) दुपारी घडली.

फिर्यादीचा मामे भाऊ शिवम फाळके हा येथील एका शाळेमध्ये शिकतो. पूर्वी झालेल्या वादातून शिवमला किरण निकम, ओंकार कदम यांनी मारहाण केली होती. सोहम पाटील याने याबाबत विद्यालयातील शिक्षकांना मारहाणीची माहिती दिली. तसेच सोहमचा मित्र रोहन शिरतोडे याने संशयित रोहन कोळीला याला जाब विचारला. त्यावेळी कोळी याने ‘तू आमच्या भांडणामध्ये पडू नकोस, नाहीतर तुला ठार मारीन”, अशी धमकी दिली.

त्यानंतर सोहम, शिवम, रोहन शिरतोडे, कार्तिक सावंत, वेदांत फाळके हे भांडण मिटवण्यासाठी पार्थ मोहिते याच्या घरी गेले. यावेळी पार्थ याने वैभव कोळी याला बोलावून घेतले. त्यावेळी कोळी याने कुर्‍हाडीने सोहमच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु सोहमने तो चुकविल्याने त्याच्या हातावर लागला. त्यामध्ये सोहम गंभीर जखमी झाला. तसेच वेदांत फाळके यालाही लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. अन्य संशयितांनी दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. सर्व संशयित फरार झाले आहेत.

Previous Post

कडेगाव उपविभागात तलाठयांचा दुबार नोंदीचा धडाका

Next Post

दुबार नोंदीतून तलाठयांनी जमवली लाखोंची माया

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दुबार नोंदीतून तलाठयांनी जमवली लाखोंची माया

दुबार नोंदीतून तलाठयांनी जमवली लाखोंची माया

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group