दुबार नोंदीतून बेसुमार वरकमाई
कडेगाव :- कडेगाव उपविभागातील काही तलाठयांनी सध्या दुबार नोंदीचा धडाका सुरु केला आहे. सध्या तरी पलूस तालुक्यातील दोन आणि कडेगाव तालुक्यातील दोन तलाठी गोपनीय खबऱ्याच्या रडारवर असून या तलाठयांनी प्रथम दर्शनी कोणतीही खात्री न करता बेकायदेशीर पणे दुबार नोंदी केल्याचे निष्पन्न झालं आहे. दुबार नोंद धरण्याचा कोणताही अधिकार तलाठी यांना नसून आपल्या अधिकाराच्या बाहेरील काम करण्याच धाडस या तलाठयांनी केवळ आर्थिक अमिषापोटी केल असल्याचे स्पष्ट होतं आहे मात्र या भ्रष्ट तलाठयांचे वर कोणाचे नियंत्रण आहे कि नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कडेगाव उपविभागातील तालुका पलूस आणि कडेगाव ह्या दोन्ही तालुक्यातील दोन तलाठयांनी दुबार नोंदी धरल्याचे खात्रीलायक वृत्त गोपनीय खबऱ्याच्या हाती लागेल असून पलूस तालुक्यात दुबार नोंदीवर तक्रार सुद्धा झाली असून मंडळ अधिकारी सध्या तक्रार केस चालवत आहेत मात्र ह्या नोंदी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी संगणमताने धरल्या असल्याचे तक्रारदार व जाणकारांचे म्हणने आहे. एका तलाठयाने तर गेल्या महिनाभरात असंख्य नोंदी बेकायदेशीर पणे दुबार धरल्या आहेत.यात प्रामुख्याने सण १९९५,९६,९७ सालच्या खरेदी खताच्या नोंदी धरण्यात आल्या आहेत. यावेळी पलूस तालुका ही अस्तित्वात नव्हता. कडेगाव तालुक्यातील एका तलाठी महाशयांनी २०१३ साली झालेल्या खरेदी खताची नोंद धरताना याबाबत कोणतीही कायदेशीर खबरदारी घेतली नाही असे दिसून येते.तर सण २०१९ पूर्वीच्या खरेदी खताच्या ही नोंदी धरण्यात आल्या आहेत.
एकूणच कडेगाव उपविभागात काही तलाठयांनी वाम मार्गाने पैसे कमवण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर दुबार नोंदीचा धडाका लावला असल्याने यांच्यावर नक्की कोण नियंत्रण ठेवणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुबार नोंदीसाठी वरदहस्त कोणाचा?
कडेगाव आणि पलूस तालुक्यातील काही तलाठयांनी सध्या जो बेकायदेशीर दुबार नोंदीचा धडाका लावला आहे त्यामागे नक्कीच कोणीतरी सूत्रधार असणाऱ आहे किंवा या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी कोणाचा तरी वरदहस्त असणाऱ असं बोललं जात असून याबाबत आता प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख काय भूमिका घेतात याकडे दोन्ही तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहील आहे.

