• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अजित पवार यांचे भाजपमधील कट्टर विरोधक गोपीचंद पडळकर म्हणाले…

Admin by Admin
July 3, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
अजित पवार यांचे भाजपमधील कट्टर विरोधक गोपीचंद पडळकर म्हणाले…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

बारामती : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबीय यांचे वैर सर्वश्रुत आहे. पवार कुटुंबावर टीका करण्याची एकही संधी पडळकर सोडत नाहीत. मात्र, अजित पवार यांनी रविवारी (ता. २) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर थेट भाष्य करणे टाळले. परंतु, त्यांनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘त्यांचे स्वागत आहे. त्यांची नेमकी काय भूमिका आहे ? कशा पद्धतीने ही भूमिका बदलली. हे एका दिवसात सगळं कळणार नाही. हळूहळू सगळं कळाल्यानंतर आपण त्यावर सविस्तर बोलू’, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या ४० सहकारी आमदारांसोबत भाजप आणि शिवसेनेशी हात मिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा दुसरा राजकीय भूकंप आहे. पण, या शपथविधीला आमचा पाठिंबा नसल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले आहे.

अजित पवार यांनी समर्थक आमदारांच्या उपस्थितीत राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गट-भाजपा सरकारचे अनेक आमदार उपस्थित होते. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, शरद पवार यांनी या शपथविधीला पाठिंबा नसल्याचे सांगितले. मी अजूनही खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा मला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असे ट्विट शरद पवार यांनी केले.

मनसे प्रमुख राज ठकरे यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे ओझं शरद पवारांना उतरवायचं होते, त्याचा पहिला अंक आज पार पडला. शरद पवारांची पहिली टिम रवाना झाली आहे. लवकरच दुसरीही टिम त्या दिशेने जाईल, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

Previous Post

NIA Raid : मोठी बातमी! मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 5 ठिकाणी शोधमोहिम; ISIS च्या संपर्कात असल्याचा संशय

Next Post

कडेगाव उपविभागात तलाठयांचा दुबार नोंदीचा धडाका

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगाव उपविभागात तलाठयांचा दुबार नोंदीचा धडाका

कडेगाव उपविभागात तलाठयांचा दुबार नोंदीचा धडाका

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group