• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांचा अवैध गौणखनीज विरोधात धडाका सुरूच

वांगीत अवैध वाळूचा ट्रॅक्टर पकडला..

Admin by Admin
June 23, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांचा अवैध गौणखनीज विरोधात धडाका सुरूच
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव:- कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी अवैध गौण खनीज विरोधातील आपल्या कारवाई चा धडाका सुरूच ठेवला आहे. वांगी येथे मध्यरात्री दोन चाकी वाहणावरून जाऊन स्वतः शेलार यांनी वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडून कारवाई करून तहसील कार्यालयात आणून लावला. या कारवाईने अवैध वाळू तस्करांचे धाबे दनानले असून सर्वसामान्य लोकांमधून मात्र त्यांच्या कारवाईचे स्वागत आणि त्यांचं कौतुक होतं आहे.

कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी कार्यभार स्विकारल्यापासून अवैध गौण खनीज विरोधात मोहीमच उघडली होती ती आजपर्यंत तरी चालू आहे. अवैध गौण खनीज रोखण्यासाठी त्यांनी विविध पर्यायांचा अवलंब केला असल्याचे बोललं जातं आहे. तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना अवैध गौण खनीज विरोधातील परिपत्रक काढले होते. तसेच अधून मधून गस्ती पथकाच्या समकक्ष स्वतः गस्त घालत फिरत असतात . यावेळी त्यांनी दोन चाकी गाडी वरून गस्त घालत वांगी येथे एक ट्रॅक्टर पकडला आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही कारवाई केल्याने तालुक्यातील अवैध वाळू तस्करांचे धाबे दनानले आहेत.

आतापर्यंत दोन महिन्याच्या कार्यकाळात शेलार यांनी नऊ अवैध गौण खनीज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे तर दुसरीकडे येरळा काठच्या शेतकरी वा सर्वसामान्य जनतेकडून तहसीलदार अजित शेलार यांच्या कारवाईचे स्वागत तर शेलार यांचं कौतुक होतं आहे.

मुरूम तस्करीकडे लक्ष देण्याची गरज

तालुक्यात सध्या अवैध वाळू तस्करांनी तहसीलदार अजित शेलार यांचा धसका घेतला आहे मात्र मुरूम तस्कर मात्र अजूनही बेफामच आहेत. तहसीलदार शेलार यांनी मुरूम तस्करी कडे ही लक्ष द्यावे अशी मागणी होतं आहे.

Previous Post

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हांडोरेला अटक

Next Post

लोकसभा-विधानसभा निवडणुकीपुर्वी समान नागरी कायदा लागू करावा – चंद्रशेखर बावनकुळे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
लोकसभा-विधानसभा निवडणुकीपुर्वी समान नागरी कायदा लागू करावा – चंद्रशेखर बावनकुळे

लोकसभा-विधानसभा निवडणुकीपुर्वी समान नागरी कायदा लागू करावा - चंद्रशेखर बावनकुळे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group