• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बालिंगा ज्वेलर्स दरोडा : पासार्डे येथील फरार दरोडेखोर अंबाजी पोलिस ठाण्यात हजर…

Admin by Admin
June 20, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
बालिंगा ज्वेलर्स दरोडा : पासार्डे येथील फरार दरोडेखोर अंबाजी पोलिस ठाण्यात हजर…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्सवरील दरोड्यातील तिसरा फरारी दरोडेखोर अंबाजी शिवाजी सुळेकर (वय 44, रा. पासार्डे, ता. करवीर) हा स्वत:हून शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला.

शाहूपुरी पोलिसांनी त्याचा करवीर ठाण्याकडे ताबा दिला आहे. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान, दरोड्यातील चारही दरोडेखोर नेपाळ सीमेवर गेल्याची माहिती

वरिष्ठ सूत्रांकडून समजते. कोल्हापूर पोलिसांचे दरोडेखोराच्या मागावर आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे गुरुवार, दि. 8 जूनला भरदिवसा कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडा पडला होता. 3 कोटी 25 लाख किमतीचे दागिने घेऊन पसार झालेल्या सात दरोडेखोरांपैकी दोघा स्थानिकांना बेड्या ठोकण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले होते. चार परप्रांतीय दरोडेखोरांचा अद्याप शोध सुरू आहे.

दरोड्याच्या गुन्ह्यातील तिसरा संशयित अंबाजी सुळेकर हा स्वत:हून शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. शाहूपुरी पोलिसांनी ताबा करवीर पोलिसांकडे त्याचा ताबा दिला आहे. करवीर पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले. मंगळवारपर्यंत त्याला पोलिस कोठडी मिळाली.

भटकंतीनंतर स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर

सूत्रधार व अंबिका ज्वेलर्सचा मालक सतीश पोहाळकर आणि विशाल वरेकर यांच्या सांगण्यावरून सुळेकरने दरोड्यानंतर पळून जाण्यासाठी कार भाड्याने घेतली होती. दरोडेखोरांनी कात्यायनी ज्वेलर्समध्ये गोळीबार केल्याची माहिती मिळताच सुळेकर गावातून निघून गेला होता. दहा दिवसाच्या भटकंतीनंतर सुळेकर स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला.

मुंबईची वारी करून तुळजापूर, अक्कलकोटला घेतला आश्रय

बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्सवर घातलेल्या दरोड्यानंतर पलायन केलेल्या संशयित सुळेकरने प्रथम मुंबई गाठली. त्यानंतर त्याने पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोटला आश्रय घेतला. देवदर्शनानंतर त्याने कोल्हापूर गाठले. स्वत:हून त्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली.

सुळेकर बनावट नोटा प्रकरणातील संशयित

दीड वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात गाजलेल्या सांगरुळ फाटा येथील बनावट नोटांप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती. या रॅकेटमध्ये त्याचा सहभाग होता. त्याने बनावट क्रीडा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रेही तयार केल्याचे पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले होते.

चारही दरोडेखोरांचा नेपाळच्या सीमेवर वावर

कात्यायनी ज्वेलर्सवरील दरोड्यातील चारही दरोडेखोरांचा नेपाळ सीमेवर वावर असल्याची माहिती पुढे आली आहे. वरिष्ठ सूत्रांकडून त्यास दुजोरा मिळत असला तरी तपास यंत्रणेकडून मात्र तपासाबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे. कोल्हापूर पोलिसांचे विशेष पथक दरोडेखोरांच्या मागावर आहे.

Previous Post

आटपाडीत घडला धक्कादायक प्रकार ; देशमुखवाडीत पुन्हा एकदा झाला प्रयत्न..!

Next Post

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पोलीस विभागाची बैठक संपन्न : महापालिकेकडून स्वच्छतेचे तर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पोलीस विभागाची बैठक संपन्न : महापालिकेकडून स्वच्छतेचे तर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पोलीस विभागाची बैठक संपन्न : महापालिकेकडून स्वच्छतेचे तर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group