• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पोलीस विभागाची बैठक संपन्न : महापालिकेकडून स्वच्छतेचे तर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन

Admin by Admin
June 21, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पोलीस विभागाची बैठक संपन्न : महापालिकेकडून स्वच्छतेचे तर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : 28 जून रोजी होत असलेल्या बकरी ईदसाठी महापालिका प्रशासनाने स्वच्छतेसह आवश्यक बाबींची तयारी पूर्ण केली आहे. तसेच येणारा बकरी ईदचा सन शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन आयुक्त सुनील पवार यांनी केले.

आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त सुनील पवार यांनी महापालिकेत महापालिका आणि पोलीस विभागाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मनपा उपआयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, पोलीस उपअधीक्षक सांगली शहर अण्णासाहेब जाधव आणि मिरज विभागाचे उपअधीक्षक प्रनिल गिल्डा आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त पवार यांनी पोलीस विभागासमवेत महापालिका स्वच्छता निरीक्षक तसेच पशू वैद्यकीय विभागाची संयुक्त बैठक घेऊन बकरी ईदचे स्वच्छ्ता, कायदा आणि सुव्यवस्था याबाबत नियोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना आयुक्त सुनील पवार म्हणाले की, बकरी ईदच्या आगोदर आणि त्यानंतरही मनपा क्षेत्रातील सर्व मशिदी आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता केली जाणार आहे. ज्या ठिकाणी कुर्बानी आहे अशा ठिकाणी तात्पुरते कंटेनर ठेवले जाणार आहेत. याचबरोबर कुर्बाणी नंतर पडणारा कचरा अन्यत्र पडू नये किंवा उघड्यावर पडू नये यासाठी त्या भागातील नागरिकांना बायोमेडिकल बॅग दिल्या जाणार आहेत. जेणेकरून कुरबानी नंतरचा कचरा त्या बॅगमधून थेट हा कचरा कंटेनरमध्ये टाकण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. गोळा केलेला कचरा हा थेट कचरा डेपोत नेऊन तिथे त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.

यासाठी मनपाक्षेत्रात ठिकठिकाणी तात्पुरते कंटेनर ठेवले जाणार आहेत. कूर्बानी नंतरचा कचरा लगेच उचलला जाणार असून दोन सत्रात हे काम कर्मचारी करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कचरा रस्त्यावर उघड्यावर न टाकता महापालिकेकडून दिलेल्या बायोमेडिकल बॅगेत भरुन कंटेनर मध्ये टाकावा असे आवाहनही आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे. यावेळी पोलीस विभागाने केलेल्या नियोजनाबाबत सांगलीचे उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यानी सांगलीतील तर प्रनिल गिल्डा यानी मिरजेतील पोलीस बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्था तयारीची माहिती दिली. तसेच येणारा बकरी ईदचा उत्सव शांततेत तसेच उत्साह पूर्वक वातावरणात आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखत साजरा करावा असे आवाहन केले.

या बैठकीस सांगली शहर पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख, मिरज शहर पोलिस निरीक्षक संजीव झाडे, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, संजयनगरचे पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, मिरज ग्रामीणचे सहा. पोलिस निरीक्षक एस एस चव्हाण, मिरज वाहतूक शाखेचे भगवान पालवे यांच्यासह मनपाचे सहायक आयुक्त अशोक कुंभार, उज्वला शिंदे, सहदेव कावडे, सचिन सागावकर, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. वैभव पाटील यांच्यासह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

Previous Post

बालिंगा ज्वेलर्स दरोडा : पासार्डे येथील फरार दरोडेखोर अंबाजी पोलिस ठाण्यात हजर…

Next Post

मंगळवेढ्याचे पाेलिस निरीक्षक रणजित माने यांची कंट्राेल रुमला बदली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मंगळवेढ्याचे पाेलिस निरीक्षक रणजित माने यांची कंट्राेल रुमला बदली

मंगळवेढ्याचे पाेलिस निरीक्षक रणजित माने यांची कंट्राेल रुमला बदली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group