• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आटपाडीत घडला धक्कादायक प्रकार ; देशमुखवाडीत पुन्हा एकदा झाला प्रयत्न..!

Admin by Admin
June 20, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडी येथे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या उपस्थितीत एका व्यक्तीचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न सोमवारी उघडकीस आला.

ग्रामस्थांनी याबाबत कळवल्यावर पोलिसांनी एक दांपत्य आणि एक महिला अशा तिघांना ताब्यात घेतले. पुंडलीक पुनाजी लोंढे, सौ.रंजना पुंडलीक लोंढे (रा.माहुलमाढा, चेंबुर(पुर्व), मुळगाव सेटलमेंट फ्री कॉलनी, नं १ सलगरवाडी पोलीस ठाणेजवळ सोलापूर) आणि अनिता प्रकाश कारंडे (रा. राचेंबुर कॅम्प, नवजीवन सोसायटी समोर,चेंबुर,मुंबई. अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान आटपाडी येथे १९ डिसेंबर २०२२ नंतर पुन्हा एकदा देशमुख वाडीत १९ जून रोजी धर्मांतर करण्याचा उघड प्रयत्न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत याबाबत नितीन मोहनराव देशमुख (वय ३५, रा. देशमुखवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी १० वाजता नितीन देशमुख यांच्या घरी एक पुरूष व दोन महीला असे तिघेजण गेले होते. त्यांनी ख्रिश्चन धर्माबाबत माहिती दिली असता नितीनने मी देवाची पुजा करीत असतो असे सांगीतले. त्यांनी येशु हिंदु धर्मापेक्षा कसा महान आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत हिंदू देवतांचा अवमान केला. जबरदस्तीने जय येशु असे म्हणण्यास सांगून आम्हास ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करु लागले.

ख्रिश्चन धर्म स्वीकारला आर्थिक लाभ होईल. तुमचे आजार दूर करु. आमचा येशु सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणु लागले. या गोंधळाच्या आवाजाने माझ्या शेजारचे आणि गावातील लोक जमा झाले. गावात अन्य एका ठिकाणी देखील असा प्रकार घडल्याचे समजले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी देशमुखवाडी येथून या तिघांना ताब्यात घेतले.

आटपाडी तालुक्यात गेल्या तीन चार वर्षात पैशांची लालूच आणि धर्मांतर केल्यानंतर मोजके लोक आर्थिकदृष्ट्या संपन्न झाल्याचे उदाहरण देऊन मनपरिवर्तन केले जात आहे. या आमिषाला अल्पसंख्यांक व अन्य समाजातील आर्थिक दुर्बल आणि सधनही बळी पडून त्यांनी धर्मांतर केले आहे. अनेक लोकांनी धर्मांतर केल्याचे निष्पन्न होत आहे.

१९ डिसेंबर रोजी आटपाडी येथील एका हॉस्पिटलमध्ये आजारी असलेल्या रुग्णाच्या डोक्यावर हात ठेऊन प्रार्थना करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे मोठा गदारोळ उडाला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा, बंद पाळून धर्मांतर मोहिमेला कडाडून विरोध केला. याप्रकरणी धर्मप्रसारक संजय गेळे याला अटक देखील झाली होती. अवघ्या सहा – सात महिन्यात पुन्हा धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Previous Post

खून | बेडगमध्ये एकाची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या

Next Post

बालिंगा ज्वेलर्स दरोडा : पासार्डे येथील फरार दरोडेखोर अंबाजी पोलिस ठाण्यात हजर…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बालिंगा ज्वेलर्स दरोडा : पासार्डे येथील फरार दरोडेखोर अंबाजी पोलिस ठाण्यात हजर…

बालिंगा ज्वेलर्स दरोडा : पासार्डे येथील फरार दरोडेखोर अंबाजी पोलिस ठाण्यात हजर...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group