• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खून | बेडगमध्ये एकाची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या

Admin by Admin
June 19, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
खून | बेडगमध्ये एकाची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज खबऱ्या प्रतिनिधी / बेडग ता. मिरज येथील मल्लेवाडी रस्त्यालगत असणाऱ्या खरात वस्ती येथील रामचंद्र ऊर्फ बंडू शंकर खरात (वय वर्षे ५०) यांचा रात्री साडे सात ते आठच्या दरम्यान घराकडे जात असताना कुऱ्हाडीने मानेवर घाव घालून निघृण खून केल्याची घटना घडली आहे.

डोक्याच्या मागील भागावर दोन व पाठवर दोन वर्मी घाव घातल्याने बंडु यांचा जागीच मृत्यू झाला. हा खून पूर्व वैमानस्यातून झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एम चव्हाण व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

मयत बंडू शंकर खरात यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात रात्री पाठवण्यात आला असून, अधिक तपास मिरज ग्रामीणचे पोलीस करत आहेत. यामध्ये गोपनीय खबऱ्याला मिळालेली अधिक माहिती अशी की, खून करून आरोपी स्वतः पोलिसात हजर झाल्याचे समजते आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.याचा पुढील तपास मिरज ग्रामीणचे पोलिस करत आहेत.

सांगली जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहता, व बेडगमध्ये एकाच महिन्यात दुसरा असा प्रकार घडल्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावात भीतीचे वातावरण आहे.

Previous Post

कोणी पुस्तकं देता का कोणी पुस्तकं?

Next Post

आटपाडीत घडला धक्कादायक प्रकार ; देशमुखवाडीत पुन्हा एकदा झाला प्रयत्न..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला

आटपाडीत घडला धक्कादायक प्रकार ; देशमुखवाडीत पुन्हा एकदा झाला प्रयत्न..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group