• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

’५० खोके आणि १०५ डोके’ नांदेडमध्ये रंगले पुन्हा बॅनरवॉर

Admin by Admin
June 17, 2023
in राजकीय
1 min read
0
’५० खोके आणि १०५ डोके’ नांदेडमध्ये रंगले पुन्हा बॅनरवॉर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नांदेड । शिवसेनेसोबत बंड करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. तेव्हापासून अजूनही भाजपमध्ये धुसफूस सुरु असल्याचे अनेकदा समोर येत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी शिंदे यांच्या समर्थकांनी राज्यातील सर्व वर्तमानपत्रात देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत मुख्यमंत्री म्हणून शिंदे जास्त लोकप्रिय असल्याची जाहिरात दिली.

या जाहिरातीमुळे त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागलेच, परंतु पुन्हा एकदा भाजप समर्थक त्यांच्यावर नाराज झाले. त्यानंतर फडणवीस यांनी शिंदे यांच्यासोबत कार्यक्रमाला जाणे टाळले होते. भाजप समर्थकांनीही अनेक शहरात बॅनर लावले होते. अशातच आता नांदेड शहरात भाजप समर्थकांकडून पुन्हा एकदा बॅनर लावण्यात आले आहेत.

’50 खोके आणि 105 डोके! देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ असे आशय असणारे बॅनर फडणवीस समर्थकांनी लावले आहेत. त्यात आचार्य चाणक्य यांचा फोटो आणि शेजारी 50 डोकी वापरली आहेत. या बॅनरबाजीमुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पालघर या ठिकाणी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात एकत्र आले होते. ‘फेव्हिकॉल का मजबूत जोड है, ये टुटेगा नही’ असे विधान एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानंतर भाजप आणि शिंदे यांच्यातील वाद मिटला असे वाटले होते. परंतु,काल नांदेड शहरात आयटीआयजवळ ‘50 खोके, 105 डोके’ असे बॅनर पुन्हा लावले असल्याने हा वाद अजून शांत झाला नाही, असे दिसत आहे.

Previous Post

देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेला अल्पवयीन तरुण विटा पोलिसांच्या ताब्यात..

Next Post

“अल्ला देवे अल्ला खिलावे अल्ला पिलावे,” ‘त्या’ व्हीडिओवर हिंदूंचा संताप!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“अल्ला देवे अल्ला खिलावे अल्ला पिलावे,” ‘त्या’ व्हीडिओवर हिंदूंचा संताप!

"अल्ला देवे अल्ला खिलावे अल्ला पिलावे," 'त्या' व्हीडिओवर हिंदूंचा संताप!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group