• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“अल्ला देवे अल्ला खिलावे अल्ला पिलावे,” ‘त्या’ व्हीडिओवर हिंदूंचा संताप!

Admin by Admin
June 17, 2023
in सामाजिक
1 min read
0
“अल्ला देवे अल्ला खिलावे अल्ला पिलावे,” ‘त्या’ व्हीडिओवर हिंदूंचा संताप!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे : “अल्ला देवे अल्ला खिलावे अल्ला पिलावे, अल्ला बिगर ना कोई, अल्ला करे सो होई!”, असं म्हणत वारकऱ्यांची दिशाभूल करण्याचा धक्कादायक प्रकार वारीत उघडकीस आला आहे.

सध्या सुरू असलेल्या दिंड्यांच्या माध्यमातून धर्मांतरण करण्याचा कट तर नाही ना, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. एक व्यक्ती “अल्ला देवे अल्ला खिलावे अल्ला पिलावे, अल्ला बिगर ना कोई, अल्ला करे सो होई!”, असे म्हणत वारकऱ्यांना अभंगाच्या चालीत गाणं म्हणायला लावतो. शेवटी संत तुकाराम महाराजांचे नाव घेतो. मात्र, ज्यावेळी आजूबाजूचे १० ते १५ वारकरी विठ्ठलाचे नाव घेतात त्यावेळेस कानाडोळा करुन काढता पाय घेत असल्याचे या व्हीडिओतून स्पष्ट झाले आहे.

"अल्ला देवे अल्ला खिलावे अल्ला पिलावे," व्हीडिओवर हिंदूंचा संताप!#Vari #pandharpurwari #Pandharpur pic.twitter.com/6W5ivP0xVH

— महा MTB (@TheMahaMTB) June 16, 2023

या प्रकरणी हिंदूत्ववादी संघटनांतर्फे तीव्र प्रतिक्रीया येत आहेत. सामाजिक सलोख्याच्या नावाखाली हे असे प्रकार वारीत खपवून घेतले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. लेखिका शेफाली वैद्य आणि लेखक तुषार दामगुडेंनीही सोशल मीडियावर पोस्ट करत याचा निषेध नोंदविला आहे. ते म्हणतात, “भारत हा हिंदू बहुसंख्य असलेला, पण तरीही धर्मनिरपेक्ष असलेला देश आहे असे आपण सर्वच जण नागरिकशास्त्रात शिकलोय, पण आपली ही धर्मनिरपेक्षता म्हणजे नक्की काय? भारत ह्या हिंदू बहुल देशात कुठल्याही जुन्या मशिदीखाली खोदलं तर जुन्या मंदिरांचे अवशेष सापडतील परंतु मंदिराखाली कधी उध्वस्त केलेली मशीद सापडत नाही.

भारत या हिंदू बहुल देशात हिंदूंमध्ये हमीद दाभोळकर सापडतो पण मुसलमानांमध्ये कुणी नरेंद्र शेख सापडत नाही. या देशातल्या हिंदूबहुल महाराष्ट्रात औरंगजेबाची थाटामाटात राखलेली कबर सापडते परंतु याच देशातल्या मुस्लिमबहुल काश्मीरमध्ये संभाजी महाराजांची साधी तसबीर देखील सापडणार नाही. भारत ह्या हिंदूबहुल देशात श्री तुळजाभवानी नावाचे ‘हलाल मटणाचे दुकान सापडते, पण ताज मटण हाऊस नावाच्या दुकानात झटका मटण तुम्हाला कधीच मिळणार नाही.

भारत ह्या हिंदूबहुल देशात हिंदूंच्या वारीत कोणी मुसलमान मुल्ला येऊन ‘अल्ला देवे, अल्ला खावे’ असले अभंग ऐटीत म्हणतो आणि मागे हिंदू वारकरी ताल धरतात, पण कधी कुठल्या दर्ग्यात किंवा मुहर्रर्रमच्या ताजियात ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हा अभंग लावलेला ऐकलाय का कुणी? भारत या हिंदूबहुल देशात अल्पसंख्य असलेले सरकारी अनुदान घेऊन निर्धास्तपणे मक्का मदीनेची वारी करायला जातात परंतु याच देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या तिर्थक्षेत्रांवर दहशतवादी हल्ल्यापासून बचावासाठी लष्कर तैनात करावे लागते.

Previous Post

’५० खोके आणि १०५ डोके’ नांदेडमध्ये रंगले पुन्हा बॅनरवॉर

Next Post

सांगलीत खळबळ ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची आठ गोळ्या झाडून हत्या

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत खळबळ ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची आठ गोळ्या झाडून हत्या

सांगलीत खळबळ ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची आठ गोळ्या झाडून हत्या

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group