महाराष्ट्रातील ४४९ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय तसेच विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
यामध्ये कडेगावचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांची विनंतीवरून बदली सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे तर शमीम शेख यांची मुंबई शहरकडे ,यासह इस्लामपूर पोलीस ठाण्याचे शशिकांत चव्हाण यांची पुणे शहर येथे बदली करण्यात आली आहे. महिला पोलीस निरीक्षक निर्मला माने यांची ए.सी.बी.कडे,तर चंद्रकांत बेदरे यांची पुणे शहर येथे बदली करण्यात आली आहे. तुरची येथील प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी संजय गिड्डे यांना मुदतवाढ दिली आहे.
तर सांगली जिल्ह्यात नव्याने दाखल होणारे अधिकारी पुढील प्रमाणे :
पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील, विद्या जाधव ,सूरज बिजली, सिद्धेश्वर जंगम, संजय हारुगडे इत्यादी अधिकाऱ्यांची सांगली येथे बदली झाली आहे.

