• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दारू पिवून त्रास देणाऱ्या मुलाची ५० हजारांची दिली सुपारी; जन्मदात्याकडून संतापजनक कृत्य..

Admin by Admin
June 17, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
दारू पिवून त्रास देणाऱ्या मुलाची ५० हजारांची दिली सुपारी; जन्मदात्याकडून संतापजनक कृत्य..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील राहुल दिलीप कोळी (वय 35) याची आत्महत्या नसून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राहुलचा खून करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकत आत्महत्येचा केलेला बनाव पोलिसांनी उघड केला.

दारू पिऊन सतत त्रास देणार्‍या मुलाचा जन्मदात्याने 50 हजार रुपयांना सुपारी देऊन खून केल्याचे समोर आले आहे.

संशयित पोवार जामिनावर होता बाहेर

खून प्रकरणातील संशयित विकास पोवार हा 2012 मध्ये स्वतःच्या वडिलांचा खून करून कारागृहात होता. तो नुकताच जामिनावर बाहेर आला आहे. याचा फायदा घेत दिलीप याने मुलाच्या खुनाची सुपारी दिली. मुलगा हाकनाक गेला आणि वडिलांच्या वाट्याला तुरुंगवारी आली.

याप्रकरणी राहुलचे वडील दिलीप तुकाराम कोळी (वय 55, रा. बिरदेव मंदिर मागे, तारदाळ), विकास अनिल पोवार (34, रा. जावईवाडी तारदाळ), सतीश शामराव कांबळे (34, रा. डॉ. आंबेडकरनगर, तमदलगे) या तिघा संशयितांना शहापूर पोलिसांनी अटक केली. त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी न्यायालयाने दिले. शहापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक अंकुश माळी यांनी फिर्याद दिली.

राहुलच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी मुलासह माहेरी राहते. दहा ते बारा वर्षांपासून राहुल सतत दारू पिऊन वडिलांकडे पैशांची मागणी करीत त्रास देत होता. त्यामुळे वडिलांनी विकास पोवार याला खुनाची सुपारी दिली. या खुनासाठी 50 हजार रुपये देण्याचे ठरले. वडील दिलीप याने 30 हजार रुपये दिले. विकासने साथीदार सतीश कांबळे याच्याबरोबर खुनाचा कट रचला. राहुलला दारू पाजून व स्वतःही नशा करून बुधवारी रात्री 11 च्या सुमारास आयकॉन फौंड्रीच्या मागे रेल्वे रुळाशेजारी कच्च्या रस्त्यावर विकासने लाकडी माराच्या सहाय्याने राहुलच्या तोंडावर, डोक्यात, कपाळावर व हातावर वार केले.

राहुलचा खून केल्याची माहिती वडील दिलीप याला दिली. दिलीपने खातरजमा केल्यानंतर खून करण्यासाठी ठरलेल्या रकमेतील उर्वरित 18 हजार रुपये दिले, अशी कबुली दिलीप याने पोलिसांसमोर दिली. खून करून पसार झालेल्या विकास व सतीश यांना इचलकरंजी येथील जुना एस. टी. स्टँड परिसरात अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Previous Post

ब्रेकिंग | सांगलीतील ५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या..पहा, कोणाची कुठे बदली..?

Next Post

शाळेत प्रार्थनेच्या तासाला शिक्षिकेने वाजवली अजान! मुंबईतील धक्कादायक प्रकार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शाळेत प्रार्थनेच्या तासाला शिक्षिकेने वाजवली अजान! मुंबईतील धक्कादायक प्रकार

शाळेत प्रार्थनेच्या तासाला शिक्षिकेने वाजवली अजान! मुंबईतील धक्कादायक प्रकार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group