मागच्या काही दिवसापासून मणिपूर राज्यातील हिंसाचाराच्या (Violence in the state of Manipur) घटना घडत आहेत. दरम्यान काल देखील एक घटना घडली आहे. काल रात्री केंद्रीय मंत्र्याच्या घरावर जमावाने हल्ला केला. आरके रंजन सिंह (RK Ranjan Singh) यांच्या घराला जमावाने आग लावली. घटनेच्या वेळी केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह घरी नव्हते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना आरके रंजन सिंह म्हणाले, “मी सध्या अधिकृत कामासाठी केरळमध्ये आहे. कृतज्ञतेने काल रात्री माझ्या इंफाळच्या घरी कोणीही जखमी झाले नाही. तळमजला आणि पहिला मजला जळाला झाला आहे.”
त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “माझ्या गृहराज्यात जे काही घडत आहे ते पाहून खूप वाईट वाटते. मी अजूनही शांततेचे आवाहन करत राहीन. जे असा हिंसाचार करतात ते पूर्णपणे अमानवी आहेत.” असं ते म्हणाले आहेत.

