• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची कमान कोल्हापुरात हटवली

Admin by Admin
June 13, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची कमान कोल्हापुरात हटवली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज कोल्हापुरात आगमन होत असताना त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेली कमान पोलीस, अतिक्रमण पथकाने काढून टाकली.

सायबर चौक येथे ही कारवाई आज करण्यात आली. शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री हे सायंकाळी कोल्हापुरात येणार आहेत. त्यांची तपोवन मैदान येथे जाहीर सभा होणार आहे.

या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी लावण्यात आल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाजवळ असलेल्या सायबर चौकामध्ये अशीच एक कमान उभारण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची छायाचित्रे होती. तथापि मुख्य मार्गावर असलेली ही कमान वाहतुकीला अडथळा करत होती. अवजड वाहने जाण्यामध्ये मर्यादा येत होत्या. ही तक्रार झाल्यानंतर महापालिका अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाने ही कमान तेथून काढून टाकण्याची कारवाई तात्काळ केली. त्यानंतर तेथून अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत सुरु झाली.

Previous Post

गुणवत्तेची गुढी उभारण्यास कडेगाव तालुका सज्ज

Next Post

सांगलीतील ‘त्या” दरोड्यात परप्रांतीयांचा हात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला

सांगलीतील 'त्या" दरोड्यात परप्रांतीयांचा हात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group