• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीतील ‘त्या” दरोड्यात परप्रांतीयांचा हात

Admin by Admin
June 13, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : बिहारमधील रेकॉर्डवरील दरोडेखोरांची माहिती सांगली पोलिसांच्या विशेष पथकाकडून घेण्यात येत होती. यावेळी बिहार आणि मध्य प्रदेशमधील टोळी या दरोड्यामध्ये हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची जादा कुमकदेखील लवकरच बिहार आणि मध्य प्रदेशकडे रवाना होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सांगली येथील रिलायन्स ज्वेल्स सराफ पेढीवर पडलेल्या दरोडाप्रकरणी आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. या दरोड्यामध्ये बिहार आणि मध्य प्रदेशमधील टोळी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिस दरोडेखोरांच्या मागावर आहेत. लवकरच त्यांना अटक करून त्यांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.

सांगलीतील रिलायन्स ज्वेल्सवर रविवार, दि. 4 रोजी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी गोळीबार करीत कोट्यवधी रुपयांचे सोने आणि हिरे लुटून नेले होते. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून जिल्ह्यासह परजिल्ह्यांतील 12 हून अधिक पथके दरोडेखोरांच्या मागावर रवाना केली होती. सांगलीतील आठ पथकांसह कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांचीही मदत घेण्यात येत आहे. त्यातील एक पथक बिहारमध्ये तळ ठोकून होते. या पथकाच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत.

Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची कमान कोल्हापुरात हटवली

Next Post

लाचखोर करजगीच्या तलाठ्याची हाव वाढली , ५० हजारची लाच घेताना दुसऱ्यांदा रंगेहात सापडला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
लाचखोर करजगीच्या तलाठ्याची हाव वाढली , ५० हजारची लाच घेताना दुसऱ्यांदा रंगेहात सापडला

लाचखोर करजगीच्या तलाठ्याची हाव वाढली , ५० हजारची लाच घेताना दुसऱ्यांदा रंगेहात सापडला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group