खबऱ्या प्रतिनिधी / कुपवाड शहरातील भारत सूतगिरणी ते अहील्यानगर रस्त्यावरील यशवंतनगर चौकात दाबेली विक्रेत्यावर शुक्रवारी रात्री 9.30 च्या दरम्यान धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी तरुणाच्या तोंडावर, छातीवर वर्मी घाव घातल्याने तो गंभीर जखमी झाला. तरूण रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळताच हल्लेखोराने तेथून पलायन केले. जखमीला शासकिय रुग्णालय सांगली येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.शुभम संतोष माने (वय 20 रा.माळी वस्ती संजयनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
घटनास्थळी डीवायएसपी प्रणील गिल्डा व कुपवाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट दिली व पंचनामा केला.ह तपासासाठी पोलीस पथक तैनात होते.काही तासातच पोलिसांनी दोन संक्षीतांना ताब्यात घेतले. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.

