• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

फेसबुकवरील अल्पवयीन मैत्रिणीस फोटो व्हायरल करण्याची धमकी ; मालगाव मधील तरुणास सक्तमजुरी ; निर्भया पथकाची कारवाई.

Admin by Admin
June 7, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
फेसबुकवरील अल्पवयीन मैत्रिणीस फोटो व्हायरल करण्याची धमकी ; मालगाव मधील तरुणास सक्तमजुरी ; निर्भया पथकाची कारवाई.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

फेसबुकवरील अल्पवयीन मैत्रिणीस फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या रोडरोमिओ विपुल राजेंद्र तोरे (वय 25 वर्षे, रा. शास्त्री नगर पाण्याच्या टाकीजवळ, मालगाव, ता. मिरज) याला 2 वर्षे सक्तमजुरी शिक्षा व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली. सरकापक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अनिलकुमार कुलकर्णी यांनी काम पाहिले. थोडक्यात हकीकत अशी, पिडीत मुलीची व आरोपीची फेसबुकवरुन मैत्री झाली. दोघांचे
एकमेकांशी बोलणे व चॅटींग सुरु झाले. मुलीच्या आईला हा प्रकार लक्षात आल्यावर तिने मुलीला
असला मित्र करु नको असा सल्ला दिला. मुलीने त्याच्याशी संपर्क बंद करुन जुना मोबाईल नंबर बंद केला. त्यानंतर 2019 मध्ये पिडीत मुलगी कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी सांगली बसस्थानकावर उभी होती. तेव्हा आरोपीने तिला धमकी देऊन “तू तुझा नवीन मोबाईल नंबर मला दे, मला तुला फोन करुन बोलायचे आहे. तू मला तुझा मोबाईल नंबर दिला नाहीस तर चार महिन्यापूर्वी दोघांचा फोटो काढला आहे, तो मी तुझ्या आई वडिलांना दाखवतो.” भीतीने तिने मोबाईल नंबर दिला.

आरोपी हा पिडीत मुलीचा सारखा पाठलाग करुन तिला धमकी देऊन तिला वारंवार गाडीवर बस अशी जबरदस्ती करत होता. ती गाडीवर बसली नाही अगर त्याचा आलेला फोन तिने उचलला नाही तरी फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देत होता. जबरदस्तीने वेगवेगळ्या ठिकाणी भेटण्यास बोलवत होता. या त्रासाला कंटाळून पिडीत मुलीने कॉलेजमधून निर्भया पथकाचा फोन उपलब्ध करुन घेऊन आरोपीला निर्भया पथकाच्या ताब्यात दिले. पिडीतेच्या आईने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. न्यायालयात पिडीत मुलगी, मुलीची आई व पंच साक्षीदार, निर्भया पथकातील कर्मचारी व तपासी अधिकारी सहायक निरीक्षक रोहित चौधरी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारी वकील श्री. कुलकर्णी यांनी आरोपीच्या शिक्षेबद्दल युक्तीवाद केला. गुन्हा गंभीर
स्वरुपाचा आहे. आरोपीने केलेला गुन्हा हा अल्पवयीन विरुद्धचा असून समाजविघातक अशा स्वरूपाचा असल्याचे निदर्शनास आणले.

त्यानुसार दोषी ठरवून शिक्षा दिली. तसेच दंडातील दहा हजार रुपये पिडीतेला द्यावेत असाही आदेश दिला. पैरवी कक्षातील उपनिरीक्षक श्री. राडे, महिला पोलिस सीमा धनवडे, सुनीता आवळे आदींचे सहकार्य लाभले.

Previous Post

कडेगाव तहसीलचा अभिलेख कक्ष यापुढं ही अद्ययावत राहणार का?

Next Post

सांगली जिल्हा परिषद सीईओ जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारीपदी बदली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली जिल्हा परिषद सीईओ जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारीपदी बदली

सांगली जिल्हा परिषद सीईओ जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारीपदी बदली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group