• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इस्लामपुरात पुन्हा दहशत .? “आमच्या गॅंगमध्ये का येत नाहीस” असे म्हणत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा गॅंगवॉरमधून खून..!

Admin by Admin
June 7, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
इस्लामपुरात पुन्हा दहशत .? “आमच्या गॅंगमध्ये का येत नाहीस” असे म्हणत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा गॅंगवॉरमधून खून..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली जिल्ह्यात क्राईम रेट खूपच वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चालू आठवड्यामध्ये नगरसेवकांनी फायरिंग केल्याची घटना, रिलायन्स ज्वेलर्सवरील १४ कोटींचा धाडसी दरोडा, याचबरोबर आता इस्लामपूरमध्ये गॅंगवॉर मधून सराईत गुन्हेगाराचा खून.. जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अपयश आल्याचे बोलले जात असून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

इस्लामपूर येथील बहे नाक्यावरील मल्हारबार समोर एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला. “आमच्या गँगमध्ये का येत नाहीस” असे म्हणत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. त्याच्या डोक्यात चोपरने वार करून तसेच दगड, विटांनी मारहाण करून त्याचा खून करण्यात आला.

मंगळवारी दहाच्या सुमारास नवीन बहे नाका येथील मल्हार बारसमोर ही घटना घडली. पोलिसांच्या रेकॉर्डवरील चार गुंडांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे समजते आहे . याप्रकरणी चौघांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश महादेव पुजारी (रा.एमआयडीसी, इस्लामपूर, मूळ रा. सातबुलता, इंडी, जि. विजापूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गजराज पाटील, सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल,व एक अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मृत प्रकाश महादेव पुजारी

याप्रकरणी रोहन रविंद्र इच्छूर (वय १७, रा. एमआयडीसी, इस्लामपूर, मूळ रा. सातबुलता, इंडी, जि. विजापूर) याने फिर्याद दिली आहे.

मृत पुजारीसह सर्व संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संशयित गजराज पाटील याची गुन्हेगारांची टोळी आहे. त्याद्वारे तो गुन्हेगारी व दहशत पसरवत फिरत असतो. मृत प्रकाश पुजारीही गुन्हेगार होता. प्रकाश हा गजराजच्या गँगमध्ये सामील होत नसल्याने त्याच्यासह त्याच्या टोळीला राग होता. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास नवीन बहे नाका येथील बारबाहेर प्रकाश थांबला होता. त्यावेळी संशयित त्याठिकाणी आले. त्यांनी त्याला “आमच्या गँगमध्ये का सामील होत नाहीस” म्हणत त्याच्यावर हल्ला केला.

गजराजने चोपरने त्याच्या डोक्यावर वर्मी घाव घातले. त्यानंतर अन्य संशयितांनी लाथाबुक्यांनी, दगड, विटांनी त्याला मारहाण करून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गुन्हे अन्वेषण शाखा इस्लामपूरच्या पथकाने भेट दिली.पुढील तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत.

Previous Post

धाडसी दरोडा प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती; लवकरच दरोडेखोरांपर्यंत पोहोचू; पोलिसांचा विश्वास

Next Post

कडेगाव तहसीलचा अभिलेख कक्ष यापुढं ही अद्ययावत राहणार का?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!

कडेगाव तहसीलचा अभिलेख कक्ष यापुढं ही अद्ययावत राहणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group