• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नात्यातील मुलीवर अत्याचार करणाऱ्या मिरजेतील नराधमास तीस वर्षे सक्तमजुरी

Admin by Admin
June 6, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
नात्यातील मुलीवर अत्याचार करणाऱ्या मिरजेतील नराधमास तीस वर्षे सक्तमजुरी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी मारूती शंकर झोरे (वय ५०, रा. मिरज) याला ३० वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे- साटविलकर यांनी खटला चालवला.

खटल्याची हकीकत अशी,ऑगस्ट २०२० मध्ये पिडीत मुलीला ११ वीच्या प्रवेशासाठी शाळेमध्ये घेऊन जात आहे असे सांगून आरोपी झोरे याने तिला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी व सोनोग्राफी करण्यासाठी मिरज येथे नेले. तपासणी केल्यानंतर मुलगी तीन महिन्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टरांना मुलीच्या वयाबाबत शंका आली. आरोपीकडे वयाबाबत चौकशी केली त्याने १८ पेक्षा जास्त आहे असे सांगितले. डॉक्टरांना संशय आल्यामुळे मिरज ग्रामीण पोलिसांना कळवले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने मुलीचे चुकीचे नाव डॉक्टरांना सांगितल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस ठाण्यात चौकशी केल्यानंतर मुलीने मित्राविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मिरज सिव्हील हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी दिलेला अहवाल व मुलीची तक्रार यामध्ये तफावत आढळून आली. तपासी अधिकारी श्रीमती प्रियांका बाबर यांनी तिच्याकडे खोलवर चौकशी केली. तेव्हा तिने आरोपी मारूती झोरे याने अत्याचार केल्याचे तसेच त्यानेच डॉक्टरांना चुकीचे नाव सांगण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट केले. आरोपीने दिलेल्या धमकीमुळे तसेच
कुटुंबाचा विचार करून तिने ही घटना कुणालाही सांगितली नव्हती. तिच्या जबाबावरुन आरोपी मारूती झोरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास करून न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. सरकारपक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलीचा जबाब व आईचा जबाब चालू असतानाच आरोपी त्यांना माझी केस मागे घ्या, माझ्याकडून चूक झाली अशी विनवणी करत होता. परंतु, पिडीत मुलीची आई आपल्या मुलीला न्याय देण्यासाठी खंबीरपणे मागे उभी राहिली. तसेच वैद्यकीय अधिकारी शिक्षा यांची साक्ष, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचा डीएनए अहवाल अतिशय महत्त्वपूर्ण ठरले. त्यानुसार आरोपीला ३० वर्षे सक्तमजुरीची सुनावली. न्यायालयीन कामकाजात पोलिस अंमलदार शामकुमार साळुंखे, पैरवी कक्षातील श्रीमती रेखा खोत, सुनीता आवळे, वंदना मिसाळ आदींचे सहकार्य लाभले.

Previous Post

दरोड्यातील सफारी गाडी “भोसे” गावात सापडली : गावात उडाली खळबळ

Next Post

धाडसी दरोडा प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती; लवकरच दरोडेखोरांपर्यंत पोहोचू; पोलिसांचा विश्वास

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धाडसी दरोडा प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती; लवकरच दरोडेखोरांपर्यंत पोहोचू; पोलिसांचा विश्वास

धाडसी दरोडा प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती; लवकरच दरोडेखोरांपर्यंत पोहोचू; पोलिसांचा विश्वास

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group