• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दरोड्यातील सफारी गाडी “भोसे” गावात सापडली : गावात उडाली खळबळ

घटनास्थळी मोठी पोलीस फौज दाखल ,गाडीत दोन रिव्हॉल्व्हर सापडले

Admin by Admin
June 6, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
दरोड्यातील सफारी गाडी “भोसे” गावात सापडली : गावात उडाली खळबळ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्स मधील धाडसी दरोड्यातील चार चाकी गाडी मिरज तालुक्यातील भोसे येथे एका शेतात सापडली. सदरची गाडी ही पोलिसांनी जप्त केलीय. सफारी एम एच 04- ET 88 94 नंबरची गाडी असून भोसे येथील संजय चव्हाण यांच्या शेतात असणाऱ्या रस्त्यावर गाडी सोडून चोरट्यानी पळ काढला. सदर गाडीमध्ये चोरट्यांची कपडे, बॅग व अन्य साहित्य पोलिसांना मिळाले. या ठिकाणी गाडीत दोन रिवाल्वर पोलिसांना सापडले आहेत. गाडी सोडून चोरटे पसार झाले आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा दाखला झाला आहे. तसेच या ठिकाणी श्वान पथक पाचारण करण्यात आले आहे.

रविवारी भर दुपारी सांगली शहरातील सांगली मिरज रोडवर रिलायन्स या सोने चांदीच्या शोरूमवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. शोरूम मधील सोन्या चांदीचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली आहे .फायरिंग करून धाडसी दरोडा घातल्यामुळे खळबळ उडाली आहे. गाडीतील साहित्यामुळे पोलिसांना दरोडेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग मिळत आहे.

Previous Post

कडेगाव तहसीलच्या माहिती अधिकाऱ्यांना माहिती अधिकार कायदा ज्ञात तरी आहे का ?

Next Post

नात्यातील मुलीवर अत्याचार करणाऱ्या मिरजेतील नराधमास तीस वर्षे सक्तमजुरी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नात्यातील मुलीवर अत्याचार करणाऱ्या मिरजेतील नराधमास तीस वर्षे सक्तमजुरी

नात्यातील मुलीवर अत्याचार करणाऱ्या मिरजेतील नराधमास तीस वर्षे सक्तमजुरी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group