• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत नगरसेवकाने गोळीबार केला ; सर्वत्र खळबळ

Admin by Admin
June 4, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत नगरसेवकाने गोळीबार केला ; सर्वत्र खळबळ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : शहरातील काँग्रेसच्या नगरसेवकाने हवेत गोळीबार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती. गांजा ओढणाऱ्या तरुणांना हटकल्याने तसेच पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून तरुणांच्या टोळक्याने नगरसेवक मयूर पाटील यांच्या हॉटेलवर आणि गाडीवर शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दगडफेक केली. यावेळी पाटील यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या जमावाला पांगवण्यासाठी तसेच स्वसंरक्षणासाठी मयूर पाटील यांनी हवेत दोन राउंड गोळीबार केल्याची माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षकांसह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

सांगलीतील शासकीय रुग्णालयाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली. काँग्रेसच्या नगरसेवकाने गर्दुल्ल्यांविरोधात पोलिसात तक्रार दिली या रागातून काही नशेखोरांनी संबंधित नगरसेवकाच्या हॉटेलजवळ जमाव जमवून धिंगाणा घातला. यावेळी शासकीय रुग्णालय जवळ असणाऱ्या नगरसेवकाच्या एमपी रेसिडेन्सी या हॉटेलवर आणि मारुती डिझायर कारवर दगडफेक केल्याची घटना घडली. या दगडफेकीत गाडीच्या पाठीमागील काच आणि हॉटेलच्या खिडक्यांचा चक्काचूर झाला होता. याची माहिती मिळताच नगरसेवक मयूर पाटील हे त्याठिकाणी आले असता जमावाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पाटील यांनी त्यांच्या रिव्हॉल्वर मधून दोन राउंड फायर केले.

यावेळी या परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या बिट मार्शलना फायरिंगचा आवाज आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून राडा घालणारा जमाव तेथून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे उपअधीक्षक अण्णासो जाधव, पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. संबंधित नगरसेवक मयूर पाटील यांच्याकडून घटनेची माहिती घेऊन पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, सांगलीत गोळीबार झाल्याच्या घटनेनं शहर हादरून गेले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दगडफेक करणाऱ्या संशयितांचा पोलीस रात्रभर शोध घेत होते.

Previous Post

अवैध वाळू तस्करीच्या वादातून कान्हरवाडीत एकाचा खून तर एकजण गंभीर

Next Post

कडेगाव तहसीलच्या माहिती अधिकाऱ्यांना माहिती अधिकार कायदा ज्ञात तरी आहे का ?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगाव तहसीलच्या माहिती अधिकाऱ्यांना माहिती अधिकार कायदा ज्ञात तरी आहे का ?

कडेगाव तहसीलच्या माहिती अधिकाऱ्यांना माहिती अधिकार कायदा ज्ञात तरी आहे का ?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group