• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अवैध दारूचे दुकान फोडले ; सांगली जिल्ह्यातील घटना.

Admin by Admin
April 27, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
अवैध दारूचे दुकान फोडले ; सांगली जिल्ह्यातील घटना.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विटा : खबऱ्या प्रतिनिधी : वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत पोलीस आणि उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांच्या साक्षीने अवैध दारूचे दुकानच फोडले.

हा प्रकार सांगली जिल्ह्यातील नागेवाडी (ता. खानापूर) येथे घडला. खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथे गुरुवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही महिलांनी गावात खुलेआम अवैध दारूविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत कायमची दारूबंदी करण्याची मागणी केली. त्यावर वारंवार मागणी करूनही अवैध दारू विक्री बंद का होत नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला. त्याचवेळी संयम सुटल्याने काही महिलांनी संबंधित दारूच्या विक्री केंद्राकडे धाव घेतली. त्यावर जमलेल्या काही लोकांनी याबाबत मोबाईल वरून विटा पोलिसांना माहिती दिली. त्यावर विटा पोलिसां चे पथक नागेवाडीकडे रवाना झाले.

याच दरम्यान, तालुक्यातील उत्पादन शुल्कचे अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले होते त्यांचे पथकही नागेवाडीत दाखल झाले. दरम्यान संतप्त झालेल्या ग्रामस्थांनीही अवैध दारू विक्री केंद्राकडे कूच केली. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत अवैध दारू विक्री तात्काळ बंद करा अशी मागणी करत दारूचे दुकानच फोडले.विशेष म्हणजे यावेळी विटा पोलीस आणि उत्पादन शुल्कचे अधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्री दुकानावर आणि दुकानदारावर कारवाई करण्याचे सोडून त्याला संरक्षण देण्याचे काम केले. त्यामुळे जमाव आणखीनच चिडला, परिणामी काही काळ वातावरण तंग बनले. दुकानातील शेकडो बाटल्या ग्रामस्थांनी स्वतः रस्त्यावर टाकायला सुरुवात करताच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दारूसाठा जप्त केला. मात्र ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी करूनही उत्पादन शुल्क विभागाने कारवाई न केल्याने जाहीर निषेध व्यक्त केला. यापुढे गावात दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यानी इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, विटा पोलिसांनी केलेल्या जप्तीच्या कारवाईत एकूण १४ हजार ५९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये देशी दारूच्या बाटल्या, बिअर, स्कॉच व्हिस्की अशा दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. या शिवाय पहिल्या धारेची गावठी दारूचा साठा देखील या ठिकाणी मिळून आल्याचे पोलिस नाईक प्रशांत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी संबंधित दारू विक्रेता सोमनाथ धोंडीराम घाडगे रा. विटा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संयम सुटला, दुकान फुटले

दरम्यान विटा ते मायणी या दरम्यान राष्ट्रीय महामार्गानजिक जवळपास तीन ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याचाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत याबाबत प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उत्पादन शुल्क विभाग गांधारीच्या भूमिकेत आहे. राष्ट्रीय महामार्गावर खुलेआम अवैध आणि गावठी दारूची विक्री होत असल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला आणि त्यातूनच आजची ही घटना घडली असे नागेवाडीतील जाणकार लोकांनी सांगितले.

Previous Post

कोल्हापुरात मनप्पुरम फायनान्स कंपनीची तोडफोड

Next Post

दंगली रोखण्यासाठी सांगलीत सर्वधर्मीय समित्यांची स्थापना..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दंगली रोखण्यासाठी सांगलीत सर्वधर्मीय समित्यांची स्थापना..

दंगली रोखण्यासाठी सांगलीत सर्वधर्मीय समित्यांची स्थापना..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group