• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दंगली रोखण्यासाठी सांगलीत सर्वधर्मीय समित्यांची स्थापना..

Admin by Admin
April 27, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
दंगली रोखण्यासाठी सांगलीत सर्वधर्मीय समित्यांची स्थापना..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : काही विघ्नसंतोषी लोकांकडून सतत जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वधर्मीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या समित्या स्थापन करून असे डाव हाणून पाडण्यात येतील, असा निर्धार सांगलीतील बैठकीत करण्यात आला.

सांगलीच्या वृत्तपत्र विक्रेता भवनात बुधवारी सर्वधर्मीय कार्यकर्त्यांची, नागरिकांची बैठक पार पडली. निमंत्रक सतीश साखळकर यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सांगली, मिरजेसारख्या शहरात दंगली घडविण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोक प्रयत्न करीत आहेत. जातीय, धार्मिक तेढ वाढेल, अशी वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे हा डाव ओळखूनच तो हाणून पाडण्यासाठी तसेच धार्मिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय बैठक बोलावली आहे. सांगली, मिरजेत सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असताना हा सलोखा बिघडविण्यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. त्यांना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.

बैठकीस गौतम पवार, पृथ्वीराज पवार, ॲड. अमित शिंदे, नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, तौफिक शिकलगार, रवींद्र शिंदे, युनूस महात, फिरोज पठाण, चंदन चव्हाण, शंभुराज काटकर, डॉ. संजय पाटील, प्रा. रविंद्र ढाले, रेखा पाटील, रजाक नाईक, ताजुद्दीन शेख, आयुब बारगीर, जसबीर कौर, तोहिद मुजावर आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांची जबाबदारी अधिक

सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, असे प्रकार रोखण्यासाठी शहरातील सर्वच पक्षांच्या प्रमुख राजकीय पक्षांची जबाबदारी अधिक आहे. त्यांनी चुकीचा प्रकार घडल्यास त्याची माहिती द्यावी.

बैठकीतील निर्णय

  1. सर्वधर्मीय कार्यकर्त्यांच्या समित्या विविध भागांमध्ये स्थापन हाेणार
    2.सामाजिक सलोखा राखण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार
    3.सण, उत्सवातील शांततेसाठी प्रयत्न करण्यात येणार
    4.पोलिस व प्रशासनास समित्या सहकार्य करण्यासाठी अग्रेसर राहतील
Previous Post

अवैध दारूचे दुकान फोडले ; सांगली जिल्ह्यातील घटना.

Next Post

व्यापारी मालामाल, शेतकरी कंगाल..! ७२ वर्षात सांगली बाजार समितीची अधोगतीच ज्यादा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
व्यापारी मालामाल, शेतकरी कंगाल..! ७२ वर्षात सांगली बाजार समितीची अधोगतीच ज्यादा..!

व्यापारी मालामाल, शेतकरी कंगाल..! ७२ वर्षात सांगली बाजार समितीची अधोगतीच ज्यादा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group