• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शरद पवारांना मोठा धक्का! भुजबळांचा विश्वासू नेता शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार

Admin by Admin
April 15, 2023
in राजकीय
1 min read
0
शरद पवारांना मोठा धक्का! भुजबळांचा विश्वासू नेता शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भयंकर वेगाने घडामोडी घडत आहेत. महत्त्वाचे राजकीय नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे त्याचबरोबर आता राष्ट्रवादीला देखील मोठे खिंडार पडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिक दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यानंतर नाशिकधील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे जवळचे सहकारी व माजी नगराध्यक्ष सुनील मोरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशा चर्चा नाशिकमध्ये रंगल्या आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे सुनील मोरे एकटेच पक्षप्रवेश करणार नसून त्यांच्यासोबत शहर विकास आघाडीचे ११ माजी नगरसेवक व शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. सुनील मोरे यांच्या पक्षांतरामुळे नाशिक ग्रामीण मध्ये भाजपला मोठी ताकद मिळणार आहे.

सुनील मोरे हे छगन भुजबळ यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. सटाणा शहर विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आजपर्यंत पक्षासाठी काम केले आहे. एवढेच नाही तर छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. यामुळे सुनील मोरे यांच्या पक्षांतराने छगन भुजबळ व पर्यायाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.

Previous Post

ब्रेकिंग! शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या दिल्लीमधील बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय

Next Post

पत्रकारांशी बोलत असताना अचानक गँगस्टर अतिकच्या डोक्यात बसली गोळी; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पत्रकारांशी बोलत असताना अचानक गँगस्टर अतिकच्या डोक्यात बसली गोळी; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ.

पत्रकारांशी बोलत असताना अचानक गँगस्टर अतिकच्या डोक्यात बसली गोळी; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group